-
“ती” – “TEE”
मी पुण्याची शान आहे संस्कृतीचे पान आहे मी सुगंधी केवड्याचे प्रकृतीचे रान आहे मी तुझ्या सच्च्या सुखांनी दाटलेले गान आहे ऐकण्या गाणे तुझे मी तानसेनी कान आहे लेक माझा सावळा अन लेक गोरीपान आहे मी भुकेल्या मूक जीवा वाढलेले पान आहे स्वच्छ त्या हिरव्या चहाच्या मी कपाचा कान आहे केरळातिल श्यामसुंदर मी गुरूहुन सान आहे…
-
स्वर्ग – SWARG
-
मणका – MANAKA
मणका माझा कणां पाठिचा नागिण कट्टर अनल जणू मस्तक माझे फडा दहाचा कृष्ण मेघना सजल जणू या मणक्याला लोंबकळूनी कैक जणांनी दगा दिला कुरकुरतो पण अजुन टिकोनी विश्वासाठी नवल जणू मणक्यावरती गझल उभी ही राज्य कराया जगावरी शिडीवरूनी कळस पूजन्या आतुरलेले कमल जणू अगीनगाडी मणक्यावरुनी आयटीत जाते ऐटीत ग धूर न ओके इंजिन पुष्पक विमान…
-
बगीरा – BAGIRAA
-
सुमार भाव – SUMAR BHAV
मधुर फळे अती कडू तुझ्यामुळेच जाहली बिया जरी न जून त्या मुळे खिळेच जाहली सुरुंग लावुनी भुईत ध्वस्त टेकडी दिसे इमारती नव्या उभ्या तळी बिळेच जाहली उन्हात वावरे फिरे थकून जाय रोज ती वहायचे खळाळुनी तरी तळेच जाहली नयन निळे नजर खुळी पडून पाकळ्यांवरी फुलांवरील अष्टगंध अन टिळेच जाहली सुमार भावसंपदा तरी म्हणे परीच मी…
-
शेणकूट – SheNakooT
धान्यधून्य अंगणात पारव्यास घाल भूक लागलीय त्यास जेवण्यास घाल कुजट मिट्ट लाकडास ऊन देच आज लागलीय ओल त्यास वाळण्यास घाल शेणकूट घे वरून घासलेट ओत चूल पेटवून त्यात ओंडक्यास घाल तेल कडक तापवून उडव मोहरीस फोडणीत स्वच्छ धुवुन माळव्यास घाल फोड फोड हालवून वाफवून छान तिखट मीठ वरुन त्यात मुरवण्यास घाल गझल-अक्षरगण वृत्त,मात्रा २१ लगावली-गालगाल/गालगाल/गालगालगाल/
-
पाऊस वेड लावी – PAAOOS VED LAAVEE
कोषातल्या कळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी मौनातल्या गळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी गळतात छप्परे भिंतीस पोपडे पण सुविचार मांडणाऱ्या शाळेतल्या फळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी घेऊन कागदांचे गलबत जहाज होड्या येतात बालके मग ओढे झरे तळ्यांना पाऊस ओढ लावी पाऊस वेड लावी भेगाळल्या धरेला मातीस तापलेल्या शिम्पावया फुलांनी बागा…