-
जलदमाला – JALAD MAALAA
फुला-पाखरांचे थवे गात आले मनाचे गुलाबी गडद पान झाले पुन्हा झिंग येण्या तशी जांभळी ती हळदुली उन्हाने भरूयात प्याले पुरा-वादळाच्या तडाख्यात काळ्या लव्हाळीपरी तृण झुकूदेत भाले झरा पीतवर्णी प्रभाती झळाळे दिशांचे फिकुटले वसन हे उडाले मृदुल पाकळ्यांवर दवाचा फुलोरा जसे कर्पुरांचे निळे दीप झाले दुपट्ट्यात हिरव्या हसे मुग्ध चाफा सुगंधात ओल्या मयुर चिंब न्हाले थिटी…
-
सत प्रेमांकुर – SAT PREMAANKUR
किती किती मी आहे सुंदर माझ्यासाठी गाते अंबर माझा अभिनय माझी काया हृदयी रुजवी सत प्रेमांकुर जीवांच्या कल्याणासाठी वेड्यासम हा माझा संगर क्षमा करा मज प्रिय बंधूंनो तुमच्यासाठी फोडिन कंकर तुमची पूजा हृदयापासुन नका ढळू चालीने मंथर मुग्ध फुलांचे भाव निरागस टिपते हे रुणझुणते झुंबर काळिज माझे सदा दक्ष हे जिनानुयांचे जपण्या अंतर प्रेमच मम…
-
सोनचाफा – SON CHAAFAA
बेधुंद होउनी तू हा माळ सोनचाफा हृदयात तव मनीचा सांभाळ सोनचाफा अलवार भावनांनी तलवार देह होता प्रसवेल गीत रमणी ओढाळ सोनचाफा आहेच सुंदरी मी वेडात बोलता मी काढेल खोड पुन्हा नाठाळ सोनचाफा काढू नकोस अर्का टिकवून ठेव रंगा जाळीतुनी धुक्याच्या तू गाळ सोनचाफा झोपून मस्त रात्री झाले पुन्हा तवाने पडते मजेमजेने हे बाळ सोनचाफा वृत्त-…
-
आस धर तू – AAS DHAR TOO
गरगरूदे जग जगाचा आस धर तू भिरभिरू दे मन मनाचा फास धर तू चाबरे हे लोक सारे शांत झाले बावर्यांचा कान आता खास धर तू आवरे मी गडबडीने पण तरीही ‘छान दिसते’ ही तिची बकवास धर तू माफ करतिल सर्व गुरुजन ज्या क्षणी मज त्या तिथीला खाउनी उपवास धर तू त्या दिशीका वाटले तिज तरकले…
-
पुन्हा धबधबावे – PUNHAA DHAB DHABAAVE
अता मी लिहावे अता मी पुसावे फिरूनी कुरूपा अचुक मी टिपावे खऱ्या पावसाला असा जोर येता पुन्हा प्रेमस्मरणी मजेने रमावे धरा चिंब झाली झरा वाहतो हा तयातील पाणी मनी साठवावे निळे मेघ आता किती कृष्ण झाले तयांसारखे मी अता मुक्त व्हावे अशी ये समोरी मला सत्य म्हणते कधीची उभी मी तया ते कळावे नदी आटलेली…
-
कुरुपतेचा अस्त – KURUPATECHAA AST
सुस्त नाही मस्त आहे मी मराठी चुस्त आहे बहरले लावण्य माझे भोवताली गस्त आहे वाहनांचा वेग नडतो जीव येथे स्वस्त आहे श्वानही वेळेत येतो लावलेली शिस्त आहे संस्कृतीला जपत म्हणते हात नाही हस्त आहे खीर ना पात्रात उरली जाहली ती फस्त आहे सुंदरा हसते ‘सुनेत्रा’ कुरुपतेचा अस्त आहे वृत्त – गा ल गा गा, गा…
-
जांभई – JAAMBHAEE
जांभई येतसे झोपना बाळही झोपले झोपना हे धुणे साठले रोजचे फक्त मी धूतसे झोपना त्रासका हा तुझा आजही पाहुणे यायचे झोपना कोठली गोष्ट मी सांगुरे चांदणे लोपले झोपना गीत तू गा सखे गोडसे चंद्रिका सांगते झोपना वृत्त – गा ल गा, गा ल गा, गा ल गा.