Tag: Ghazal in akshargan vrutta

  • शुभ्र कुंतलात – In pure curls

    शुभ्र कुंतलात सांग गुंतणे अता कशास होउया तरंगरूप बिंब सांगते जलास आस संपताच भास दूर जाय क्षितिजपार हारजीत कागदीच जिंकले कुणी कुणास? भांडण्यास भेटलो उन्हामधील चांदण्यात तीच वेळ खूप मस्त वाटली जरी न खास भावभोर लोचनात सांजस्वप्न दाटताच देतसे गुलाबपुष्प कंटकासही सुवास तू तसाच मी अशीच भेटण्यास ये निवांत रंगुदेत मैफिलीत माझिया-तुझ्या घरास वृत्त –…

  • मधुर मधुर मस्त काळ – “Blissful and pleasant era”

    व्यक्त व्हावयास हाच मधुर मधुर मस्त काळ नयन वाचण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ तू गुलाब मी शबाब तू नवाब मी शराब प्रीत प्राशण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ लोचनात बिंब पाहताच भ्रमर का अधीर अधर चुंबण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ पुस्तकात मैफिलीत चांदण्यात नाचतेच गझल ऐकण्यास हाच मधुर मधुर मस्त काळ भांडणे पुरे…

  • झळाळणार – “will shine”

    जे असेल पूर्ण सत्य ते सदा झळाळणार दगड मंत्र बोलणार अन मृदा झळाळणार रंग रूप अन स्वरूप प्रकटतील गुण अनेक मुग्ध मौन हर कळीत नव अदा झळाळणार थंड बोचऱ्या हवेत मोहरून शेत रान सावळ्या भुईमधील संपदा झळाळणार मोति आणि पोवळ्यात पारिजात बहरताच रातराणिच्या फुलांत शारदा झळाळणार चंद्र चूर चांदण्यात चंचला झुले हवेत गोरट्या तिच्या करात…

  • आजकाल बोलण्यास – ” To speak now a days”

    आजकाल बोलण्यास सवड नाय ऐकण्यास कोण का म्हणेल सांग ये निवांत भेटण्यास वेळ ना तयांस अन्न रांधण्यास खावयास पण सदा तयार तेच शर्यतीत धावण्यास खर्च जाहल्यावरी हिशेब चोख ठेवतात गुप्त फुकट जे मिळेल ते बसून लाटण्यास रंगरूप बदलतात हायफाय वागतात जोखती दुजांस फक्त आरशास टाळण्यास टापटीप राहतात लाजतात ते श्रमांस लाजकाज सोडतात फक्त पाय चाटण्यास…

  • फेडणार पाप कोण -“Who will atone for the sins”

    पुण्य खूप कमविलेस फेडणार पाप कोण कर्मनिर्जरा तुझीच द्यावयास जाप कोण हा पुढे उभाय वाघ तापमापि ही प्रचंड प्रश्न फक्त एवढाच मोजणार ताप कोण बंदुकीत मी कधीच दारु पूर्ण ठासलीय भांडणास रंग हाच ओढणार चाप कोण हा महाल नाहतोय चांदण्यात संपदेत उंबऱ्यात ज्ञानदीप उलथणार माप कोण मंगळास काळसर्प कोंडतोय कुंडलीत सापळा पुरा तयार कोंडणार साप…

  • कालसर्प कुंडलीत – “Destiny snake in horoscope”

    कालसर्प कुंडलीत त्यास फक्त ठेचणार जो असेल देवळात त्यास नित्य पूजणार बंगल्यात झोपडीत जर फिरे भुजंग साप सर्पमित्र होत त्यास वाटिकेत धाडणार केवडा बनात नाग मस्त राहती निवांत नागिणींसवे तिथेच ते मजेत डोलणार माणसे भिऊन त्यास तो भिऊन माणसांस छेडल्याविना कुणा कधी न सर्प चावणार श्रावणात पंचमीस वारुळास जाय पोर त्या अजाण बालिकेस शिक्षणास जुंपणार…

  • हृदय कमल – Lotus of the heart

    चालतेस चंचले उन्हात गीत गात गात पावसात वादळात उग्र शीत गात गात सोड हात हो पुढे भरार उंच क्षितिज पार झेप यान घेतसे तुझीच जीत गात गात नाव चंचला जरी सदैव शांत चित्त शुद्ध वाट चालते सदैव जोजवीत गात गात वाटतात ही फुले सुगंध रंग या जगात सांडतात बरसतात देत प्रीत गात गात हृदय कमल…