-
सुगंध-लीला – SUGANDH-LEELAA
रंगात रंगुनी मी जाणार पंचमीला समृद्ध फाल्गुनाच्या बघुनी सुगंधलीला कोकीळ तान घेता आंब्यावरी सुखाने वेळू बनात वारा गाईल संगतीला येई वसंत मित्रा भिजवावयास तुजला मिटवून टाक शंका सांगेल मैत्रिणीला अंगावरी सरी घे होण्यास चिंब पुरते झरतील प्रेमधारा मातीत पेरणीला मृदगंध कोंडलेला वार्यासवे निघाला मी दूत प्रेमिकांचा सांगेल साजनीला वृत्त – गा गा ल गा, ल…
-
युद्ध – YUDDHA
रणांगणावर युद्ध पेटले गळे इथे अवरुद्ध जाहले विशाल पर्वत गर्द पाहुनी किती दिसांनी बुद्ध हासले हिमालयावर बर्फ फोडण्या करीत तांडव वृद्ध नाचले पिढी जुनी बरबाद जाहली तरूण सारे क्रुद्ध जाहले जळून जाता क्षार तापुनी निळे सरोवर शुद्ध भासले वृत्त – ल गा ल गा गा, गा ल गा ल गा.
-
स्वप्न नवे – SWAPN NAVE
तुज पाहते तुज ऐकते मज एवढेच कळे प्रिया मनी मानसी खग गातसे उबदार कंठ वळे प्रिया पडताच स्वप्न नवे निळे दव प्राशुनी खिरते निशा हसऱ्या उषेस पहावया नयनात डोह तळे प्रिया घन सावळा गगनी फिरे चमके नभी बिजली जरी हृदयात प्रीत जपावया भय सोड तू सगळे प्रिया उचलायचा न मला अता नच रिक्त वा भरला…
-
शिशिर वारे चालले – SHISHIR VAARE CHAALALE
बावऱ्या गझलेस माझ्या स्थैर्य आता लाभले शेर सारे प्रकटलेले अंतरातुन उजळले कलम हाती घेउनी मी फोडता या हिमनगा शुभ्र मौक्तिक चूर्ण माझ्या भोवताली सांडले ना सिकंदर व्हायचे मज ना गुरूही व्हायचे जिंकण्या हृदये फुलांची मी बहर हे माळले गोठल्या झाडात पुन्हा आवाज काही गुंजता मृदुल हिरव्या पालवीने अंग त्याचे रंगले शब्द मोहक अर्थ सुंदर वृत्त…
-
टाळू नको – TAALOO NAKO
हासता निर्व्याज्य पुष्पे हासणे टाळू नको हासणाऱ्या या फुलांना माळणे टाळू नको पुण्य आले धावुनी बघ हे तुला भेटायला पुण्य तव शब्दात सुंदर गुंफणे टाळू नको दुःख भरता जन्मभरचे वाहत्या अश्रुंमधे आसवांना गाळण्याने गाळणे टाळू नको द्यावया तव रंग अधरा वासरी ही फडफडे वासरीला त्या गुलाबी वाचणे टाळू नको नाटकातिल पात्र वेडे भेटते जेंव्हा तुला…
-
कैदखाना – KAID-KHAANAA
ये उन्हा ताप रे मौन तू सोड रे प्रीतिचे ते जुने गौप्य तू फोड रे ढेकळे जाहली या मृदू मातिची नांगरू शेत हे औत तू जोड रे वर्षता मेघ हे हासना खदखदा पावसाची करुन मौज तू गोड रे छप्पराच्यावरी सूर्य हा बागडे यावया किरण तलि कौल तू तोड रे ना जिना त्या घरा कैदखाना जणू…
-
गझाला – GAZAALAA
झालरीचा घेर असुदे वा चुडी ती चुस्त असुदे ही गझाला दक्ष रमणी प्रीत बोली रम्य असुदे तीन असुदे चार असुदे लक्ष अथवा अब्ज असुदे नेत्र उघडुन पाहणारे लक्ष्यभेदी भक्त असुदे मौन असुदे वा पुकारा ध्यास जीवा रंगण्याचा मुग्ध हृदयी फूल जपण्या प्रेम सच्चे फक्त असुदे मज नको फुकटात काही बंगला गाडी मळा रे सर्व मी…