कमरेला मी तुझा पुढाऱ्या कसा बांधुनी आज मिरवते
कंबर कसण्या गाळ उपसण्या लेखणीचा मम बाज मिरवते
कर्म बांधले आजवरी जे मला न चिंता बिंता त्याची
गळ्यात काळी पोत आणखी जळणाऱ्यांची लाज मिरवते
पोतराज अंगणात नाचे मारित फटके स्वतः स्वतःला
पोत्यांचे पोतेरे त्याचे डोईवरचा ताज मिरवते
संगमरवरी ताजमहाली बसून बेगम गझला लिहिते
दुधी असूदे अथवा काशी भोपळ्यातले राज मिरवते
मिस यू मिस यू म्हणता म्हणता मोजुन चकरा चक्कर येता
तुझ्या तटावर मौन पडूनी तुझीच गझले गाज मिरवते