Tag: Ghazal in maatraa vrutta

  • चिती – CHITEE

    धांगडधिंगा किती पावसा सांग असाका अती पावसा वेड तुला का असे लागले फिरलीका तव मती पावसा झाड वडाचे तुझ्या काननी पाव म्हणे तुज सती पावसा धार खरी कापण्या भिजवण्या घे पवनासम गती पावसा घनफळ बिनफळ तुझे मोजण्या कुठली आणू चिती पावसा

  • इलाज – ILAAJ

    वाळलेली शुष्क पाने लटकलेली कोवळी प्रासुक उन्हाने बहरलेली झिंगलेली गझल साकी बघ सुनेत्रा आम्रतरुवर गात गाणे झोपलेली … मयुरपिसारा हरिणी पाडस धवल लाल पुष्पांची पखरण हिरवाईने सलज्ज काया मात्रा माझ्या इलाज औषध … जर्द लाल जर्बेरा आणिक धवल पीत कुसुमांची वर्दळ हिरवाईचे वसन लपेटुन ऐके पानांची मी सळसळ अक्षर ओळी पाठवलेल्या पत्रामधुनी आठवतिल ग सई…

  • टायर – TAAYAR(TYRE)

    कधी कधी मी असते टायर कधी फुटूनी उडते टायर एक रिटायर टायर दिसता कधी नवे मी बनते टायर एक रिटायर एक स्टेपणी कधी असे पण म्हणते टायर काय लागते शेर लिहाया कधी गझल मग लिवते टायर मक्ता लिहिणे बरे सुनेत्रा कधी गुरूला स्मरते टायर

  • नेलकटर – NAIL CUTTER(NEL KTAR)

    जुना पुराणा नेलकटर गोष्ट खरी सांगेल कटर जुना पुराना नेलकटर चेहऱ्यास चाटेल कटर जुना पुराणा नेलकटर नजर कोठडी जेल कटर माय राज मी शक न म्हणत बेशक शक काटेल कटर कापुनही जो जुळवेलच तोच मुला भावेल कटर मला नि मल्ला यात फरक काय तुला कळवेल कटर अर्धेमुर्धे ब्लेड नको म्हणून तुज टाळेल कटर नकली लज्जा…

  • धन्य श्रेणिका – DHANY SHRENIKA

    धन्य श्रेणिका तुझी चेलना भावशुद्धिची देय प्रेरणा कोद्रूचा आहार दिल्यावर शृंखलेतुनी मुक्त चंदना त्रिशलानंदन सिद्धार्थाचा महावीर तीर्थंकर श्रमणा महावीर प्रभु मुनिसंघातिल प्रथम अर्जिका तिला वंदना ज्येष्ठेसह साध्वी भगिनींप्रति कृतज्ञतेची नित्य भावना घोर अंगिरस अरिष्टनेमी मुनी दिगंबर वायूरशना जिनधर्माची ध्वजा फडकुदे गिरनारावर हीच कामना

  • फुले जुईची – FULE JUICHEE

    नाजुक कोमल फुले जुईची नाजुक सुरभित फुले जुईची वारा वाहे झुले पहाया नाजुक शीतल फुले जुईची

  • जा ! जा ! जारे ! वारे ! – JAA ! JAA! JAARE ! VAARE !

    वादळ वारे ! वारे ! म्हणते गा! रे ! वारे ! शीळ वारियाची ही ! स्वर हे सा !रे ! वारे ! म्हणते फुलवत ज्योती ! अरेस का रे ! वारे ! सागर तीरी वेगे ! सुटले खारे ! वारे ! वाह ! वाह ! वा ! वा वा ! लखलख तारे ! वारे !…