Tag: Ghazal in maatraa vrutta

  • अंगठा – ANGTHAA

    अंगठा… हिरवी पाने पसाभर आत्महिताचा वसा वर शक्य झाल्यास सहज तू भ्रष्ट राज्य खालसा कर परत परत पाड नाणी रिक्त झालाय कसा तर गुंफुन सयी बकुळ फुले घाल गळा छानसा सर आयुष्याचं सोनं झालं जपत अंगठा ठसा धर

  • हुमान – HUMAAN

    कोडे कसले हुमान हे तर माझ्यामधले इमान हे तर गगन भरारी घडवायाला दारी आले विमान हे तर लपवुन काही कशास ठेवे मला दावते गुमान हे तर मन माझे मज मुक्त सोडते करे न कधी अनमान हे तर भरून माझ्या अंतरात रे सदैव राखुन मान हे तर अश्रू नेत्रांमधून गाळू काम करूया किमान हे तर सामानावर…

  • खोडी – KHODEE

    जरी चिडविले कुणावरुन पण खोडी थोडी खरी हवी कोण कुणाच्या गोष्टी सांगे त्यातिल गोडी खरी हवी कुणा धबधबा कुणास अभयारण्य पावते खरेच का आत्मधर्म रथ पुढे न्यावया उमदी घोडी खरी हवी खरडत झरझर बघून कॉपी बखरीमधुनी करताना इतिहासातिल सत्य जाणण्या पळती मोडी खरी हवी शतजन्मांतिल नातीगोती कशास स्मरणे या जन्मी धन्य व्हावया मनुज जन्म मम…

  • रोजी रोटी – ROJEE ROTEE

    रोज थापते रोजी रोटी मोजत बसते रोजी रोटी पडुन पालथी आगीवरती ओज फुलवते रोजी रोटी कशी द्यायची चुलीसमोरी पोज शिकवते रोजी रोटी नकटे चपटे असो मापटे नोज उडवते रोजी रोटी क्षुधा शमविण्या भुकेजल्यांची बोज उचलते रोजी रोटी

  • आनन – AANAN

    अभ्यासाचे साधन पुस्तक ज्ञान मिळविण्या कारण पुस्तक स्वाध्यायास्तव विनम्र भावे करते हाती धारण पुस्तक दो घटकेच्या मौजेखातर नकोस ठेवू तारण पुस्तक जीव ओतुनी लिहिल्यावरती आत्मसुगंधी कानन पुस्तक बिंब दाविते ज्याचे त्याला तुझे सुनेत्रा आनन पुस्तक

  • गरे वाटण्या – GARE VAATANYAA

    विसरुन जा ते असे कुणाला म्हटले तरिही आयुष्याशी बोलू द्यावे .. बरे वाटण्या फणस खोबरी वर काटेरी सोलायाला मदत विळ्याला करण्यासाठी .. गरे वाटण्या बरे वाटता गरे वाटता झरे वाहती हृदयामधले ऊर मोकळा .. होतो नकळत अंतरातुनी उमलुन येतो अभिनय उपजत खऱ्यांपुढे पण खरे वागणे .. खरे वाटण्या

  • कुरल -KURAL

    गझलेसाठी गझल हवी .. सृष्टीसम ती कुशल हवी … वरवर वाटे कुरल जरी .. अंतरातुनी सरल हवी… जरी दाटते गच्च मणी .. झरताना पण तरल हवी … नको कोरडी ठक्क बरे .. जलदासम ती सजल हवी … गझल सराईत गझल नवी .. नित्य वाटण्या नवल हवी …