-
कोसला – KOSALA
प्रीतकी जंजीर हो या अभिमानका खंजीर, भाषा ब्रह्मांडकी हो या पिंडकी, धर्म राष्ट्रका हो या देशका,अथवा प्रादेशीक.. हृदयका धर्म प्रेम होता हैं … दोन रुबाया १) कोसला.. होऊन फुलपाखरु मकरंद प्राशाया कोसला धडपडे कोष फोडुनी सुटण्या घोळात रुबाई मात्रांच्या पण येई स्वातंत्र्य जपाया मार्ग स्वतःचा घेई… २) पाकळी मृदु पाकळी मनाची प्रेमे उलगडता दवबिंदुत भिजुनी…
-
सी समुद्र – SEA SAMUDRA
देश मूक जाहलाय मौन ना पेटलीय भूक आज चौर्य ना कापुनी नखे सुयोग्य रंगवा राहता नखात घाण हौस ना काफिया स्वरात शोध घेतसे गंडल्या अलामतीत मौज ना नाव काय दफ्तरी लिहायचे गाजल्या सभा गतात चौक ना दगड पुफ्फ पापण्यांस चिकटता जाण हक्क घेत देत कौल ना कोरफड कुवार गौर लेखणी तरु लहानसे महान पौर ना…
-
चोरखण – CHOR KHAN
ठेव प्रतिष्ठा तुझी पणाला सत्यासोबत कधीतरी मज भेट सणाला सत्यासोबत लख्ख झळाळी मम पर्णाला सत्यासोबत शिव सुंदरता मन स्वर्णाला सत्यासोबत नजराणा धन नकोच लुगडे बोल मोकळे लाव सुपारी चोरखणाला सत्यासोबत जीवांचे कैवारी जीवच लढत राहती अभय मिळाया वनहरणाला सत्यासोबत संयम मार्दव संगे शुचिता आर्जव तपवुन मिरची तडका दे वरणाला सत्यासोबत दिला दाखला न हयातीचा मतदानास्तव…