-
आनन – AANAN (FACE)
-
गरे वाटण्या – GARE VAATANYAA (SHARING)
-
कुरल -KURAL(CURLY)
-
डाकिया – DAAKIYAA (POSTMAN)
फुका कधी ना वाढविते मी भाव माझिया भावाचा अर्थपूर्ण मम गझल उमलते होत काफिया भावाचा लयीत येती शब्द नाचरे रदीफ होण्या गझलेचा परिमल पसरव गझल फुलांतिल तूच वारिया भावाचा कर्माष्टक जाळून तपाने हिशेब चुकता करुन पुरा देवगुणांच्या टोळीमधला मुक्त डाकिया भावाचा आंतरजाली फिरता रमता कर्मास्रव झाल्यावरती अंतरातही जाळे विणतो सुबक कोळिया भावाचा देहमंदिरी आत्मा माझा…
-
टिकाव – TIKAAV (PICKAXE)
मम आत्म्यावर माझी प्रीती स्वभाव माझा नेणिवेतले आठवण्या ना सराव माझा मनापासुनी जे जे शिकले आठवेल मज सुयोग्य समयी सहज व्हावया उठाव माझा दिशादिशातुन वादळ येता पार व्हावया मला कधीही नडला नाही विभाव माझा कुटी हवेली शेत बंगला याहुन जिवलग काया माझी या जन्मातिल पडाव माझा मी न मांडला मी न मोडला फक्त पाहिला तुझियासाठी…
-
जनित्रे – JANITRE (GENERATORS)
कुठेतरी भुंकतेच कुत्रे वादळात उडतातच पत्रे चित्रकार नसतातच भित्रे हवी तशी रेखतात चित्रे एक असे जे ते तर संत्रे बहुवचनी संत्री अन छत्रे पुत्राचे बहुवचन न पुत्रे तसेच मंत्राचे ना मंत्रे एका दिवशी अनेक सत्रे आडनाव आठवले अत्रे गरगर फिरती कैक जनित्रे वहीत माझ्या त्यांची चित्रे मक्ता लिहिते खास सुनेत्रा गुंफाया शेरांची सुत्रे
-
मसाज – MASAAGE
हाताने कर मसाज चेंडू घरातले कामकाज चेंडू गुगलीवरती षट्कारास्तव उसळुन फळीवर गाज चेंडू मोजिन टप्पे झाकुन डोळे ठोकत फरशीस वाज चेंडू बिंब स्वतःचे स्वतःत बघण्या मला कशाची न लाज चेंडू कसे जगावे आनंदाने शिकव जगूनी रिवाज चेंडू लय मस्तीचा धरून ठेका मनापुढे पढ नमाज चेंडू भोगरोग जर छळतो वृद्धां शोध तयावर इलाज चेंडू अनवट कोडे…