Tag: Ghazal in maatraa vrutta

  • कताई – KATAAEE (SPINNING)

    समुदायाने सूतकताई करे शांतीचा दूत कताई भुंकत कुत्रे कुठे निघाले जिथे करे रे भूत कताई हत्ती पाळावया पोसण्या करे रोज माहूत कताई चरखा फिरवुन सहजपणाने शिकवे करण्या पूत कताई हडळ स्मशानी बसून करते वस्त्रे नेसुन धूत कताई चरख्याचे भांडार भराया आला तुजला ऊत कताई

  • माती – MAATEE (SOIL)

    तापुनी आक्रन्दतेना फक्त सोसे तप्त लाव्हा मूक माती मृत्तिका मूर्ती क्षमेची फाटते पण धरत नाही डूक माती का क्षमेची नाटकेही चाललेली माणसांची या धरेवर ती निसर्गा बांधलेली माणसासम ना करे हो चूक माती

  • स्वभाव – SWABHAAV (NATURE)

    फुलाप्रमाणे कोमल सुरभित वज्रासम खंबीर स्वभाव मुक्तिपथावरच्या आत्म्यांचा शूर वीर अन धीर स्वभाव धर्म अहिंसा शाश्वत जगती बिंबविण्या आचरणातून मन वचने कायेतुन झळके शुद्ध अहिंसक मीर स्वभाव पुण्याईने मनासारखे घडते जेव्हा सारे छान जणु काचेच्या पात्रामधले मधुर सुवासिक क्षीर स्वभाव यौवन धन सत्तेची मदिरा चढते जेव्हा मस्तिष्कात उतरविण्या ती मादक धुंदी होतो वेडा पीर स्वभाव…

  • गोडवे – GODAVE (MELODIS)

    प्रभात होता उघडुन फाटक कामाला जावे.. असेल जरका सुट्टी तर मग निवांत झोपावे… झोप पुरी मी घेतो म्हणुनी इतुका मज संयम.. यास्तव आपण दशधर्माचे गोडवेच गावे…

  • गारुडी – GAARUDEE (SNAKE- CHARMER)

    सूर ताल अन लय असताना लय असताना गाणे गावे भय नसताना लय असताना अधरीच्या वा लिहिल्या गाण्या यंत्र पकडते मंत्र भारली सय हसताना लय असताना चारित्र्याची ऐशी तैशी म्हणे गारुडी पुद्गल शब्दां मय डसताना लय असताना निश्चय काही करू न शकला बघत राहिला व्यवहाराचा नय फसताना लय असताना जय जय जै वा जैकाराचा घोष दुमदुमे…

  • घरकाम – GHARKAM( HOUSE HOLD CHORES)

    इतुके लिहुनी नकोस टाकू टाकुन टाकुन दमशील ग इतुके गझले नकोस झाकू झाकुन झाकुन दमशील ग वाकून तू ग करिशी कामे दिवसरात्रभर किती किती इतुके बाई नकोस वाकू वाकुन वाकुन दमशील ग

  • गा गा शेरा – GAA GAA SHERAA (SING A SONG..DEAR)

    पानगळीने झाड बहरते शिशिरानंतर.. शिशिरानंतर… वसंत येता पुन्हा लहरते फुलल्यानंतर.. शिशिरानंतर… ग्रीष्मानंतर वर्षा येते धरा भिजविण्या बी अंकुरण्या.. भिजते खुलते जमीन बीजे रुजल्यानंतर.. शिशिरानंतर… शरदचांदणे हेमंताची शाल सुनहरी निळ्या अंबरी पांघरून मन हृदय सजावे भरल्यानंतर.. शिशिरानंतर… कागद कोरा त्यावर कशिदा विणता भरता गात लेखणी.. ऊन सोसते घाम गाळते शरदानंतर.. शिशिरानंतर… बिंब हलतसे पाण्यामधले थरथर त्याची…