Tag: Ghazal in maatraa vrutta

  • जिवलग – JIVALAG (BELOVED)

    व्यक्त कराया भावभावना गझल लिहावी काफियातल्या अलामतीला जपत लिहावी दोस्ता जैसा रदीफ जिवलग शान वाढवी गझल कुणीही मनात गुणगुण करत लिहावी

  • त्रस्त – TRAST (IRRITATED)

    तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची मतला माझा कुणा कधी ना पटतो दोस्ता मतला माझा माझ्यासाठी असतो दोस्ता आवडलेल्या ओळीवरती तरही लिहिते तुझा त्यातुनी विचार मजला कळतो दोस्ता असे लिहावे तसे लिहावे डोस प्राशुनी कधी न आत्मा त्रस्त तरीही विटतो दोस्ता शब्दांवर का असे कुणाची सांग मालकी नवोदितांना शब्दचोर तो म्हणतो…

  • भोला – BHOLAA (NAIVE)

    तरही गझल गझलेची पहिली ओळ कवी बिनधास्त बालाजी मुंडे यांची कुठे मनाला खोलायाची सोयच नाही आता म्हणेन कोणा भोला याची सोयच नाही आता इतुके त्यांनी जीव कोलले मनोरंजनासाठी विटीस सुद्धा कोलायाची सोयच नाही आता नंदीबैलासमान त्यांनी डोलविल्यावर माना सुरांवरीही डोलायाची सोयच नाही आता मीच कातडे सोलत जाता माझ्या कायेवरले पक्व केळही सोलायाची सोयच नाही आता…

  • चिंधी संधी – CHINDHEE SANDHEE (PETTY CHANCE)

    चिंधी संधी….. (दोन मुक्तके) मला हवी तर मिळेल मजला संधी बिंधी कशास बांधू जखमेवरती चिंधी बिंधी रक्त सांडुदे म्हणून करते कानाडोळा तुला वाटते तशी न मी रे अंधी बिंधी … इच्छा आहे जगावयाची म्हणून मी या जगती आहे मरेन केव्हातरी पुढे मी तुजसाठी पण संधी आहे मरावयाची असली चिंधी संधी मजला नकोच आहे इच्छेविन मज मारायाची…

  • मंत्र – MANTRA (SPELL)

    अक्षर बीजांमधुनी उमटता मंत्र हृदय मंदिरी हवे कशाला कर्मकांड अन तंत्र हृदय मंदिरी जरी मोजुनी मात्रा लगक्रम यंत्री भरला तरी विशुद्ध भावांविन ना चाले यंत्र हृदय मंदिरी

  • खरा अर्थ – KHARAA ARTH (TRUE MEANING)

    खरा अर्थ ना चा मला सांग तू रे जसे होय हो ना तशी भांग तू रे लगा गाल गागाल गा गाल गा गा अशी चाल लावून दे बांग तू रे मना वाटते ते इथे मांडले मी जरी ना दिलेला कुणा थांग तू रे लिहाया पुसाया पुसूनी स्मराया कसे नित्य बघतोस पंचांग तू रे पहा पाच…

  • हंबर – HAMBAR (MOOING)

    तुझ्या नि माझ्या दुःखामध्ये अंतर आहे पाण्याविन ही जमीन माझी बंजर आहे अंतरातल्या मम दुःखाला रंगरूप ना रंगरुपाहुन स्वभाव त्याचा सुंदर आहे दुःखाला मी करुन दिगंबर निर्भय झाले माझ्यासाठी हाच सुखाचा मंतर आहे कैक आयड्या करून वेड्या गझला लिहिल्या त्या गझलांचे गोठ्यामध्ये झुंबर आहे गोठ्यामधल्या जित्राबांचे शेण काढुनी सारवलेल्या जमिनीवरती लंगर आहे शेणकुटे मी रोज…