-
ओढा – ODHAA
आयुष्य सुखाने जगतो आम्ही आयुष्य सुखाने भरतो आम्ही व्यापार सुखाचा करती कोणी आयुष्य सुखाचे करतोआम्ही चारित्र्य घडाया अपुले सुंदर आयुष्य सुखाचे स्मरतो आम्ही पाऊस पडाया निघतो जेव्हा आयुष्य सुखावर फुलतो आम्ही धारांत भिजाया येता ओढा आयुष्य सुखावर झुलतो आम्ही गझल मात्रावृत्त (मात्रा १८)
-
छत – CHHAT
रंगबिरंगी छत्र्यांचे छत वाटेवरती रांग दिव्यांची आहे तेवत वाटेवरती पदपथ इतुका मस्त भोवती फुले वाटिका ज्येष्ठातिल सर आहे नाचत वाटेवरती शालीसम घन मृदुल मुलायम हिरवळीवरी थेंब दवाचे फुलले शत शत वाटेवरती टेबलखुर्च्यांवरी बसूनी घेऊ कॉफी गप्पाटप्पा करता पाहत वाटेवरती लाल गुलाबी हिरवे पिवळे निळे जांभळे रंग मनातिल खुलतिल बरसत वाटेवरती गझल मात्रावृत्त (मात्रा २४)
-
काटा – KAATAA
प्रियतम झारा आत्मा सुंदर प्रियतम काटा आत्मा सुंदर प्रियतम माझा आत्मा सुंदर प्रियतम झाला आत्मा सुंदर काळ्या जलदांमधुनी चमके प्रियतम तारा आत्मा सुंदर लहर सुगंधित बनुनी येतो प्रियतम वारा आत्मा सुंदर नृत्य विजेचे बघत बरसते प्रियतम धारा आत्मा सुंदर घट मातीचा बीज तयातिल प्रियतम साधा आत्मा सुंदर माय यशोदेची जिवलग ती प्रियतम राधा आत्मा सुंदर…
-
आहुती – AAHUTEE
यज्ञामध्ये दे ग आहुती तूच श्यामले पण कार्याची घेच पावती तूच श्यामले आठवणीने तुझ्या फाइली ठेव पावती शोध कागदी निळी नाव ती तूच श्यामले कनकलतेवर फुले कंचनी तळी मृदा घन त्याच मृदेची बनव आरती तूच श्यामले वरवरच्या रंगाला भुलली मिथ्यादेवी सुखी अंत अन खरी आदि ती तूच श्यामले मातृदेवता अंबा दुर्गा तुझ्या अंतरी भादव्यातली सरल…
-
“सा” – “SAA”
कुणी टाकिला तळ्यात मासा माझ्यासाठी कुणी बनविला त्याचा फासा माझ्यासाठी घन फाश्यावर कोणी लिहिले कुणी वाचले तोच खरा पण प्रियतम खासा माझ्यासाठी “रे ग म प ध नी” चा मज आला सांगावा रे तरी निमंत्रण धाडेना “सा” माझ्यासाठी धुवेन पात्रे निर्झरातल्या जलात निर्मळ त्याआधी ती तुम्हीच घासा माझ्यासाठी घरांस वासे किती लाविले नकाच मोजू काढुन…
-
आतम समई – AATAM SAMAEE
घरात बसुनी ना काजळली आतम समई जीवासाठी मम मिणमिणली आतम समई क्षीण जाहली…. लहरीने वाऱ्याच्या अवखळ क्षणभर विझली पुन्हा उजळली आतम समई भूकंपाने घर कोसळता पुरात बुडता देवघरातिल तमात टिकली आतम समई सम्यक्त्त्वी ज्ञानाने घडली थरथरली पण मिथ्यात्त्वाने कधी न दिपली आतम समई वादळवारे सुनामीसही पुरून उरली चक्राला भेदून तेवली आतम समई गझल मात्रावृत्त (मात्रा…
-
कागद – KAAGAD
दशधर्माची शिडी चढोनी दहा पावले मोक्षासाठी उचल उचल माणसास प्राण्या उचल बाहुले मोक्षासाठी कथापुतळ्यांसम जीवन जगणे मम जीवाला ना मानवते चक्रव्युहासम क्लिष्ट सापळे कुणी बनविले मोक्षासाठी कुणी कुणाला पावत नसते फक्त पावती कर्मे अपुली देच पावती अथवा कागद जे जे जळले मोक्षासाठी तेलवात जळण्यासाठीही पात्र लागते हवा लागते मी देहाचे पात्र ताणले पण उजळवले मोक्षासाठी…