-
जगण्याची रे गंमत घे – JAGANYAACHEE RE GAMMAT GHE (DEAR FRIEND..ENJOY THE LIFE..)
असो चाळिशी वा पन्नाशी जगण्याची रे गंमत घे साठी बुद्धी नाठी खाशी जगण्याची रे गंमत घे विशीतल्या गुजगोष्टी स्मरुनी काव्य प्रीतिचे नवे रचू घड्याळ बांधू बारा ताशी जगण्याची रे गंमत घे सम्मेदाची यात्रा केली श्रवणबेळगोळा गेलो कशास आता हाजी काशी जगण्याची रे गंमत घे रानपाखरांसंगे गाऊ हस्ताच्या धारेत भिजू रानी डुलते कंच कपाशी जगण्याची रे…
-
आत्माजीराव – ATMAJI RAO (DEAR TO THE SOUL)
आल्या ग नाचत पाऊस धारा आश्विनासंगे वाजवी पावा रानात वारा आश्विनासंगे सोवळे नेसुन जानवे घालुन मंत्रास बोले उपाध्या गुरुजी शोभतो तारा आश्विनासंगे देहात मौनी बैसला आहे आत्माजीराव गावया अधीर फोडून कारा आश्विनासंगे मातीस ओल्या आकार देण्या हस्त हे माझे पाडण्या बुंदी धरतात धारा आश्विनासंगे काव्यात झरझर नाव गुंफाया कवयित्री तुझे शाईचा गाढ उतरेल पारा आश्विनासंगे…
-
बरसो सावन -BARASO SAAVAN (POUR DOWN SAVAN)
-
पानाभवती – PAANAA BHAVATEE (AROUND THE LEAF)
छुमछुम छुमछुम पैंजण वाजे पानाभवती उदक सुगंधी दवबिंदूंचे पानाभवती पदन्यास कलिकांचे पाहुन दिशा उजळता कुंदफुलांसम गझल डोलते पानाभवती चिंब वल्लरी हळद माखली फुले सुगंधी परिमल प्राशुन वारा नाचे पानाभवती झरझर विणते घालित टाके पाऊस धार सळसळणारे अक्षर पाते पानाभवती आरसपाणी पान भुईचे तयात अपुले बिंब पाहण्या गगन उभे हे पानाभवती गझल मात्रावृत्त (मात्रा २४)
-
आरसपाणी – AARAS-PAANEE (TRANSPERANT)
-
गोमटसार – GOMAT SAAR (BOOK WRITTEN FOR GOMMAT)
फांदीवरती पोपट फार हलवे फांदी फोगट नार गोम्मटरायाच्या साठीच गुरुने लिहिले गोमटसार गझल औषधी काढा लाल धरण्या भाळी कोमट धार आम्रतरूच्या घन छायेत मस्त उन्हाळी खोपट गार प्रतिभा साकी ज्या खोलीत नाव तिचे रे सोमट बार धारदार जरी शस्त्र तुझे हात करे तव बोथट वार बळे कुणाच्या न गळा पडे ‘सुनेत्रा’ न ही लोचट हार…
-
की पर्सन – KEY PERSON
कुलुपांसाठी किल्ल्या बनवे की पर्सन मी मोह न मजला कुठला झुकवे की पर्सन मी कलम फिरवुनी कड्या उचकटे उखडे झटपट अजस्त्र टाळा खोलुन हलवे की पर्सन मी टाळ्याला अभिषेक घृताचा वेदीवरती मनोज्ञ दर्शन भक्तां घडवे की पर्सन मी शांती तृप्ती मिळण्या जीवा कैक प्रकारे मंदिरातली घंटा बडवे की पर्सन मी चोरांच्या उलट्या बोंबांना बुकलून छान…