-
हिम्मत – HIMMAT
नजर भिडविण्या मम नजरेला हिम्मत लागे हात लावण्या मम कमरेला हिम्मत लागे हवीच तुज जर माझी मैत्री बदल स्वतःला धडक द्यावया मम टकरेला हिम्मत लागे मार हव्या तू चकरा जितक्या मारायाच्या मोल द्यावया हर चकरेला हिम्मत लागे नकोस नखरा फक्त करू तू सांभाळ तया सांभाळाया त्या नखरेला हिम्मत लागे भाषेमध्ये मिसळुन भाषा एक कराया रूळ…
-
जाडी जाडी JAADEE JAADEE
-
अंतरज्वाला – ANTAR JVAALAA
मी न दुखविले व्यर्थ कुणाला म्हणून मजला दुःख नसे सदैव जपली अंतरज्वाला म्हणून मजला दुःख नसे हृदयी माझ्या रहावया ये कायमचे तू खरे खरे असे निमंत्रण दिले सुखाला म्हणून मजला दुःख नसे निसर्ग नियमांचे नित पालन करुन रक्षिते स्वधर्म मी स्वच्छ ठेविते ह्रुदय जलाला म्हणून मजला दुःख नसे अक्षर अक्षर सजीव होते लहरीवर मम काव्याच्या…
-
गर्वाचे घर – GARVAACHE GHAR
-
माशांची शिकार – MAASHAANCHI SHIKAAR
जुनाट विहिरीवरती जाइन शिकार करण्या माशांची नेम धरोनी गळास फेकिन शिकार करण्या माशांची पाऊसगाणी म्हणेन मी ग धारांमध्ये भिजेन मी पावसातही अविरत गाइन शिकार करण्या माशांची काटेरी सोनेरी मासे झुळकन सुळकन फिरताना आवडीचे त्यां तुकडे टाकिन शिकार करण्या माशांची जळात लहरी लहरीवर फिर माझ्या मोठ्या माश्या तू तुझ्यामागुती तव मासोळिन शिकार करण्या माशांची पकडिन मासे…
-
फांदीवरती – FAANDIVARATI
प्राणपाखरे धडपड करती झुले शोधण्या फांदीवरती जाळे घेउन फिरे पारधी खिळे ठोकण्या फांदीवरती झाडांवरती पर्णपिसारा फळे पहुडली पानोपानी नजर तीक्ष्ण मम मनहरिणाची फुले शोधण्या फांदीवरती लाखो दवबिंदू ओघळती मोत्यांसम तरुतळी साठती तृण वनदेवी कुदळ आणती तळे खोदण्या फांदीवरती रंगत जाता सुरेल मैफल पहाट तारा नभी उगवला विसरुन गेल्या शासनदेवी विळे, ओढण्या फांदीवरती गझल गुणाची कणखर…
-
चकल्या पाळे – CHAKALYA PAALEE
गझल लिहेन तुझ्यासाठी कमळ बनेन तुझ्यासाठी जलद रडेल खरेखोटे ख कोसळेन तुझ्यासाठी अशीच मस्त धुवांधार ग पडत जगेन तुझ्यासाठी कडवट कोळ मिठाईला विरघळवेन तुझ्यासाठी तिखट मधुर चकल्या पाळे कडक तळेन तुझ्यासाठी चल ललने फिरु बाजारी गुण उधळेन तुझ्यासाठी जरी सरळ तरल ‘सुनेत्रा’ कुरुप दिसेन तुझ्यासाठी गझल – १४ मात्रा लगावली – लगा/लगाल/लगागागा/