Tag: Ghazal in maatraa vrutta

  • तांबड – TAAMBAD

    पूर्व दिशेला तांबड फुटता तप्त जाहले रक्तिम्यात त्या बुडून जाता रिक्त जाहले पहिल्या धारेच्या गझलेने तृप्त जाहले चवीचवीने तिला प्राशिता मुक्त जाहले पहाटवारे टपले होते बोल टिपाया चुंबून त्याला कषाय माझे गुप्त जाहले भावभावना सांडत होत्या पापण्यांतुनी शिस्त लावण्यासाठी त्यांना सक्त जाहले चोर लुटारू लुटण्या येता तुला ‘सुनेत्रा’ अवगुण उघडे गुण सारे मम सुप्त जाहले…

  • छळवादी – CHAALHAVAADEE

    छळवादी रिपु पूर्ण जळूदे शुद्ध जलाने हृदय भरूदे मनात किंतू कुणाच्याच ना हीच अवस्था खरी टिकूदे माझ्याही अधरातुन झरझर तुझ्या गझलमाला बरसूदे चंचल हरिणी शांत रागिणी तिच्या उरी संगीत झरूदे तुडुंब विहिरी जोहड धरणे तळी जलाशय तृप्त असूदे गाठवलेले गोठवलेले मणी मोकळे घन वितळूदे मित्र मैत्रिणींसंगे निर्भर मुक्त ‘सुनेत्रा’ ला विहरूदे मात्रावृत्त(१६ मात्रा)

  • सुरस खरी – SURAS KHAREE

    जमेल तेव्हा ये सवडीने गोष्ट ऐकण्या सुरस खरी रसिक जनांना मनभावन पण तुझ्यासाठी ती कुरस खरी नकोच तोरा मिरची पुढती तीच तिखट अन सरस खरी नकोस गर्जू ओठ फाकुनी नेत्रांमधुनी बरस खरी एक फूलही सुगंध भरले पुरे त्यांचिया साक्षीला हव्या कशाला भेटी वस्तू प्रेमासाठी तरस खरी नकोच स्पर्धा नको परीक्षा नजर भिडव नजरेला तू तुझ्या…

  • छत्री – CHHATREE

    छत्री घेउन निळी निळी फिरायचे मी जळी स्थळी पाऊस धार ये धो धो तुडुंब भरण्या धरण तळी कडेकपारी या धुंडू खळखळणाऱ्या शुभ्र घळी पानापानांवरी हसे प्राजक्ताची कळी कळी श्रावण बरसे रंगसरी इंद्रधनूला मार हळी मात्रावृत्त(१४ मात्रा)

  • यमाई – YAMAAEE

    नजरेमध्ये प्रेम असूदे विषय कशाला वयात अन्तर अंतरात मग प्रणय कशाला भाव भावना भरून वाहे कुठे वास ना वसन लपेटू दहा दिशांचे प्रलय कशाला स्वभाव अपुला जपेल  ‘मी’ रे नको काळजी कधी उसळ अन उर्मट हो तू विनय कशाला मला न भीती अपघाताची अन मरणाची मीच यमाई तुझ्याकडुन मज अभय कशाला अचूक समयी समई विझते…

  • भुगा – BHUGAA

    अखेर मी गाठलेच त्यांना अखेर मी कोंडलेच त्यांना वरून अक्षत जरी वाटती अखेर मी चाळलेच त्यांना किती खडे पांढरे काढुनी अखेर मी ठेचलेच त्यांना ठेचुन चेचुन भुगा करोनी अखेर मी पेरलेच त्यांना सुगंध मातीतला उधळण्या अखेर मी वाटलेच त्यांना मात्रावृत्त(१६मात्रा)

  • बादल – BAADAL

    बादलीत बरसतोय बादल दलदलीत झिरपतोय बादल बदबद वर्षत रिता जाहला रिक्त मनी पसरतोय बादल दल बदलूनी गिरगिट होतो शेर होत गरजतोय बादल श्वेतश्याम वा कृष्णधवल म्हण शब्द अब्द प्रसवतोय बादल हलका फुलका पुन्हा होउनी निळ्या नभी लहरतोय बादल मात्रावृत्त(१६मात्रा)