-
घडा – GHADAA
घडा गडगडे गोल गड्या हलते पाणी तोल गड्या अर्थ जाणण्या मौनांचा बुडी मार तू खोल गड्या भाव नेत्रिचे हरिणीसम अर्थ काढणे फोल गड्या अमोल माझी गझल गुणी तिचे खरे कर मोल गड्या अनुभूतीचे मिळव गरे साल फळांची सोल गड्या अचूक टिपणे ही माझी पकडण्यास तव झोल गड्या गरगर भिरभिर नजर फिरे मम डोळ्यांवर डोल गड्या…
-
खरे नबाबी – KHARE NABAABEE
नको निळे अन, नको गुलाबी, पत्र धाड रे खरे नबाबी लिहुन मायना, वहिनी भाभी, पत्र धाड रे खरे नबाबी रंग रुपाची, सुमार चर्चा, हेवेदावे, तू तू मी मी वगळुन असल्या, क्षुल्लक बाबी, पत्र धाड रे खरे नबाबी रंगबिरंगी, फूल सुरंगी, सुकले अथवा, असो कागदी सुगंध घोळुन, त्यात शबाबी, पत्र धाड रे खरे नबाबी नको प्रिय…
-
चपला – CHAPALAA
व्यर्थ कुठे हळहळली नाही अधेमधे ती वळली नाही सुबोध भाषा या गझलेची पण मूढांना कळली नाही नागीणीसम असून चपला भिववाया सळसळली नाही जरी पेटली जरी भडकली कुणावरीही जळली नाही तेल तापता फुलून आली अर्धी कच्ची तळली नाही वादळ गारांच्या माऱ्याने फांदीवरुनी गळली नाही परिघामधुनी सहजच सुटली इथे तिथे ओघळली नाही मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)
-
मोक्षानंद – MOKSHAANAND
त्रास सरावा श्वास मिटावा श्वास मोकळा शुभ्र हसावा शुभ्र मनाचा रंग खुलावा रंग प्राशुनी सुगंध यावा सुगंध भरला देह फळावा देहामध्ये प्राण असावा प्राणीमात्रा मोक्ष मिळावा
-
सुपली – SUPALEE
सुकली खपली उडली खपली गहू चवीचा असली खपली रडकी कन्या हसली खपली भरण्या कचरा सुपली खपली जखमा भरता धरली खपली नकळत माझ्या पडली खपली स्वर्ग गाठण्या गळली खपली मात्रावृत्त – (४+४=८मात्रा)
-
जगण्याचा उत्सव – JAGANYAACHAA UTSAV
मी माझ्या जगण्याचा उत्सव तू माझ्या फुलण्याचा उत्सव आठवणी रंगात बुडवुनी प्रेमाने खुलण्याचा उत्सव रिक्त जाहल्या धरणांमध्ये तुडुंब जल भरण्याचा उत्सव मोद वाटुनी मुदित होउनी खळखळुनी हसण्याचा उत्सव काव्यसरींच्या धारांमध्ये चिंब चिंब भिजण्याचा उत्सव मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)
-
सण मनभावन – SAN MANBHAAVAN
हिरव्या पानी फुलेल फुलवा सुगंध उधळित हसेल मरवा सतेज हळदी कुंकुमवर्णी प्रीत प्राशुनी भरेल गडवा मंदाग्नीवर मृदुल करांनी काटेरी घन खुलेल हलवा गोड हासऱ्या लेकींसाठी फांदीवरती झुलेल झुलवा अनुरागाचे गीत गुलाबी रागामध्ये सुरेल बसवा सत्त्यासाठी प्रेमासाठी सैनिक अमुचा लढेल कडवा वाण लुटाया संक्रांतीचे सण मनभावन असेल बरवा मात्रावृत्त (८+८=१६)