-
अंनिस – ANNIS
विचार अमुचा आहे पक्का म्हणते अंनिस उठेल पेटुन मानव सच्चा म्हणते अंनिस नकोत शस्त्रे जिंकू युद्धे बाहुबलाने अभय व्हावया बालक बच्चा म्हणते अंनिस बंधुत्वाची ज्योत तेवण्या दृष्टी देण्या दादा भैय्या भाऊ अण्णा म्हणते अंनिस हत्या करुनी भ्याड पळाले तोंड लपवुनी निसर्ग त्यांना देइल धक्का म्हणते अंनिस विज्ञानाचे मर्म जाणुनी शास्त्र जाण रे कर श्रद्धेचा पाया…
-
निश्चय अमुचा – NISHCHAY AMUCHAA
भयास जाळू निश्चय अमुचा नाती जोडू निश्चय अमुचा मायाचारी कपट वक्रता उखडुन टाकू निश्चय अमुचा परम अहिंसा धर्म सुखाचा हिंसा त्यागू निश्चय अमुचा जीव जपूया मने जपूया बकबक टाळू निश्चय अमुचा हवे कशाला नाटक जगण्या खऱ्यास माळू निश्चय अमुचा मात्रा-सोळा=(आठ+आठ), १६=८+८.
-
कुंकुम औक्षण – KUMKUM OUKASHAN
रक्षाबंधन व्रत अमुचे माता रक्षण व्रत अमुचे छत्र जपाया वडिलांचे कुंकुम औक्षण व्रत अमुचे स्वतःच बांधू करी अता सम्यक कंकण व्रत अमुचे घरास खिडक्या दरवाजे ठेवू अंगण व्रत अमुचे सुगंध देण्या जगताला होऊ चंदन व्रत अमुचे श्वास मोकळा करावया फुलवू नंदन व्रत अमुचे नीर सुनेत्रा खळखळण्या विचार मंथन व्रत अमुचे मात्रा-चौदा=(आठ+सहा), १४=८+६
-
उकार सुंदर – UKAAR SUNDAR
हसण्याचे किती प्रकार सुंदर पाहुनी लिहिती हुशार सुंदर कशास घुसळुनी मिळते लोणी कुलूपबंद कर विचार सुंदर दशधर्मातील सहा पुरवण्या शोधा त्यातील नकार सुंदर स्वगतामधूनी मुक्त व्हावया ज्योत समईची रफार सुंदर पंचमेरूचे शिखर गाठण्या वेलांटीयूत उकार सुंदर मात्रा -सतरा=( नऊ+आठ), १७=९+८
-
मोक्ष हवा – MOKSH HAVAA
पुरे जाहली, अता परीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा लपले त्यांना, देण्या शिक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा मुला-फुलांना, सुखी ठेवण्या, प्राणपणाने, लढेन मी सत्य जाणण्या, उपाय दीक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा बांध घालण्या, स्वैरपणाला, हवेच शासन, धर्माचे प्रत्येकाला, सुंदर कक्षा, मोक्ष हवा मज, मोक्ष हवा जपती सारे, जीव जिवांना, हाच स्वर्ग रे, असे खरा…
-
काळच सुंदर – KAALACH SUNDAR
This Ghazal is written in maatraa vrutta. It is written in sixteen(16) maatraas. In this Ghazal the poetess says, I want happiness in the whole world. I want to see the happiness in the whole world. सुखात मी अन सुखात सारे मला भावते असेच वारे नवल कशाचे काळच सुंदर धरणीवरती शशधर तारे मी सर्वांवर प्रेमच…
-
गझल समीक्षा – GAZAL SAMIKSHAA
This ghazal is written in maatraavrutta (16 maatras). Ghazal samiksha means literary criticism of ghazal. गझल समीक्षा माझी सबला कविता माझ्या वत्सल अचला झळक झळकतिल मराठमोळ्या झकास फक्कड सुंदर गझला स्वच्छ नेटक्या देह मंदिरी मी काव्याचा सुगंध भरला धूर ओकतो मम मोबाइल शुभ्र अग्नी मी हाती धरला झ झबल्याचागं मला भावला नको ‘सुनेत्रा’ गज़ला गजला