Tag: Marathi Baal-geet

  • गब्दुल्ला – GABDULLAA

    एक होता अब्दुल्ला गाल त्याचे गब्दुल्ला चोर येता लुटायला केला त्याने कल्ला सोटा घेऊन चोरांवर केला मोठा हल्ला अडकवलेल्या किल्ल्यांचा त्याला मिळाला छल्ला उघडून पेट्या चोरांच्या त्याने मारला डल्ला माल घेऊन डोईवर दूर गाठला पल्ला

  • ऊन काहिली – UOON KAHILEE

    ऊन काहिली थंड कराया पाऊस गाणी झरती चला जाऊया सैर कराया डोंगर माथ्यावरती कुदळ फावडे घेऊन हाती हात आमुचे खणती तण उपटूया खड्डे करूया खांब रोवण्यासाठी भूमी मापन अचुक करूया घेऊन हाती काठी घाम गाळूया माती भरुया धावू वाऱ्यापाठी मडके भरुया सडा शिंपुया  जमीन करण्या ओली लांबी रुंदी उंचीसंगे भरून टाकू खोली कुंपण गर्द कराया…

  • शाळा – SHAALAA

    प्राण्यांची भरली शाळा पक्षी झाले गोळा त्यांनाही दिली जागा फुलांच्या रंगीत बागा प्राण्यांना दिले पटांगण त्यांनी केले रिंगण खेळ खूप खेळले खेळामध्ये दंगले आकाशी उडाले पक्षी सुंदर हवेत नक्षी पक्षी आले रिंगणावर खाली उतरले भराभर त्यांनी आणला फळा शाळेला लागला टाळा

  • ट चे गाणे – TA CHE GAANE

    ट ट टमटम म्हणतेय कम कम टा टा टाटा दावतेय वाटा टि टि टिमकी भलतीच खमकी टी टी टीका करायला शिका टु टु टुकटुक बास झाली चुकचुक टू टू टूम पळाली धूम टे टे टेकू लावायला शिकू टै टै टैया अगो बैया बैया टो टो टोप जा आता झोप टौ टौ टौका डोलतिया नौका टं…

  • झाडांसंगे करून मैत्री – ZAADAANSANGE KAROON MAITREE

    झाडांसंगे करून मैत्री चला गाउया गाणे चिमण्यांसाठी स्वच्छ अंगणी भरड पाखडू दाणे शकुन सांगण्या रोज कावळा उडून येता दारी न्याहरीस मग देऊ त्याला गरमागरम भाकरी गच्चीमध्ये रान पारवे नाचत येती जेव्हां वाढू त्यांना चघळायाला कडधान्याचा मेवा तहानलेला पक्षि अनामिक बनुन पाहुणा येता वाडग्यातुनी पाणी देऊ नाश्त्याला पास्ता सायंकाळी झोपाळ्यावर बसून झोके घेऊ दिवा लावुनी देवापुढती…

  • थोडी नाही थोडी नाही – THODEE NAAHEE THODEE NAAHEE

    थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी म्हण तिला लाडे लाडे शाणुबाई उठा इग्गो बिग्गो अग्गो असला सोडा खुळचटपणा आवाजात भसाड्या गाणे गुणगुणा ठोकून द्या थाप म्हणा हाच राग तोडी… थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी शेजारणीशी जोरजोरात करा गप्पाटप्पा उघडून टाका मनाचा कुलूपबंद…

  • श्याम सुंदर सावळा – SHYAAM SUNDAR SAAVALAA

    माळ गुंफण्या पोवळा घर बनविण्या ठोकळा खाण्यासाठी ढोकळा घाऱ्या करण्या भोपळा खीरीसाठी कोहळा तुरट आंबट आवळा गोड मोर-आवळा बाळ मनाचा मोकळा श्याम सुंदर सावळा