-
बोलले मी – BOLALE MEE
This verse is about expressing yourself. The poetess has made beautiful use of personification where she speaks with the breeze that flows around. Humans avoid expressing themselves as much as the breeze, lightning and other natural elements are willing to express themselves. When the sky gets choked up by clouds, the lightning comes to the…
-
नारी सम्यकदृष्टी – NAREE SAMYAKDRUSHTEE
जाति : हरिभगिनी आंतरजाली बहरुन आली सुरभित अक्षरसृष्टी रखाडीतल्या ठिणग्या फुलवी नारी सम्यकदृष्टी नाकारे पंथाचा चष्मा गटातटाचा नारा तिला डांबण्या ब्रह्मांडी या नाही कुठला कारा पटते ते ती लिहिणारी नोकर ना पण सरकारी अढळ ध्रुव पण दरबारी नकाच लागू तिचिया नादी असाल जर का भ्रष्टी रखाडीतल्या ठिणग्या फुलवी नारी सम्यकदृष्टी अंधरुढींना डोक्यामध्ये कधी न देते…
-
विशुद्धमती – VISHUDDH MATEE
कोमल कुसुमांवरी रंगल्या उडते फुलपाखरू भृंगासम गुणगुणते गाणे चंचल मनपाखरू मधमाश्या मधुसंचय करिती बांधुन पोळे छान लोट सुवासिक वाऱ्यावरती धुंद केतकी रान आंबेराईवरून येते लहर सुगंध भरली काटेरी कुंपणावरीही रातराणी फुलली नीर व्हावया शीतल सुरभित वाळा माठातळी बंद पाकळ्यांमध्ये जपते परिमल चाफेकळी ग्रीष्माची चाहूल झळाळी मोद उधळते मनी कवीमनाच्या पऱ्या बसंती झुलताती अंगणी असा उन्हाळा…
-
चिद्घनचपला – CHIDDGHAN CHAPALAA
जाति : झपूर्झा हावभाव रे आवडले हास्य तापले सुंभ जळाले कातळकाया पाझरली पीळ सुटोनी कळ तुटली कातळातुनी वर आली भरून प्याला सांडू लागला काय जाहले सांग बरे निर्जरा ! कर्मनिर्जरा ! बाह्यरुपाला जे भुलले ते पाघळले ते काजळले शिकविण्यास त्या अंधांना घालित बसले कोड्याला खिळे ठोकुनी झाडाला ते झाड अडे कोड्यात पडे आग लाविता खाक…
-
घाबरू कशाला – GHAABAROO KASHAALAA
घाबरू कशाला काळास म्हणते लेखणी कापे कडे राहुनी काळासवे लंबकापरी आंदोले मागे पुढे पाहता ती मान वेळावुनी मागे थबकतो काळही मुग्ध होतो पाहून कृष्ण तिचिया अधरी ग बासरी लेखणीच शिकवते नवी भाषा खुल्या वर्तमानाला आणते भानावरी भूतकाळास फोडते भविष्याला आजमावे शक्ती अणुकणांतील ना राहते गाफील चौफेर फिरे दाही दिशात पण हातात नाही ढाल घुसमटता ऊर…
-
शुभस्य शीघ्रम – SHUBHASYA SHEEGHRAM
इतुक्या सुंदर भूमीवरती जगावयाला मिळते आहे भाव फुलांचा तयात दरवळ भरावयाला मिळते आहे लाल असुदे अथवा काळी भूमी प्रसवे वृक्ष लतांना उलते फुलते अंकुर जपते उदरभरण प्राण्यांचे करण्या काठावरती वसोत वाड्या सरिता दुहिता अखंड वाहो नीर तिच्यातील शुद्ध ठेवण्या मती आमुची तत्पर राहो अभयारण्ये हिरव्या राया वन्य जिवांना मुक्त फिराया प्रकृतीतल्या अन्न साखळ्या रहो सलामत…
-
कवयित्री – KAVAYITREE
कोण काय म्हणेल कशास चिंता करिशी कवयित्री कवित्वाचा दागिना तुला लाभला झळाळणारा खरा हृदयातुनी तुझ्या वाहे प्रेमाचा खळाळणारा झरा काव्यातुनी उधळशी हिरे मोती नाही कुठे तू उणी राहू केतू ग्रहांची तुला ना पीडा तुला न वक्री शनी शिडीविना पोचतेस तारांगणी उडोनी पंखाविना वेचशी तारे नभीचे गुंफावया गजरा सुईविना समान तुला पुनव अमावस हिंडतेस ग्रहणी रानात…