-
हंगामा – HANGAAMAA
वृद्ध घालता धिंगाणा किती माजला हंगामा नाठी बुद्धी साठीला प्रत्यंतर बघ हा दंगा आजोबांच्या काठ्यांनी चोपचोपले अंगांगा आगडोंब वळ उठलेहे बोलव आगीच्या बंबा बंबाची वाजे घंटा पोरांनो थांबा थांबा गझल मात्रावृत्त (मात्रा १४)
-
कवित्त्व – KAVITTV
लिहित रहा तू स्वतःस कळण्या हवे स्वतःला काय दुखविलेस का व्यर्थ स्वतःला कारण शोधुन काढ संदेहाच्या हिंदोळ्यावर झोके घेत अनेक विचार घुसळुन सापडेल तुज काव्याची लय छान भुकेल्यास दे घास स्वतःतिल प्रेम मुक्या जीवास प्रायश्चित्तासाठी आता कशास व्रत उपवास भेटीसाठी जो जो आतुर फक्त तयांना गाठ गाठीभेटी घडण्यासाठी प्रयत्न कर तू खास गुरू स्वतःचा स्वतःच…
-
साळूता – SAALOOTAA
गोरी गोरी राधा गवळण जळात जाळे सोडे फिरवुन जाळे बुडता पाण्यामध्ये मासे फिरती झुळकन सुळकन लहरत विहरत जाळ्याभवती कुणी अडकते तयात पटकन मासोळी कुणी चंचल चपला निसटे जाळ्यातुनही पटकन जाळे फेकत काठावरती हसते गोरीमोरी गवळण भरले मडके घेउन येई घरी आपुल्या ठुमकत गवळण मडके ठेउन तुळशीपाशी साळोत्याने झाडे अंगण मात्रावृत्त(१२+४ =१६ मात्रा)
-
भिजल्या पानावरी – BHIJALYAA PAANAAVAREE
भिजल्या पानावरी लिहावी गझल तुझ्यासाठी घडवावे मी मरूनसुद्धा नवल तुझ्यासाठी घडवायाचे मला न काही दाखविण्यासाठी खिरुनी विरुनी होतिल स्वप्ने तरल तुझ्यासाठी शिशिरामध्ये पाने गळती धरा शुष्क होते मी ग्रीष्मातिल वळवाची सर सजल तुझ्यासाठी प्रभात समयी पानांवरती टपोर दवबिंदू बनेन मी त्या दवबिंदूसम धवल तुझ्यासाठी कधी वात मी कधी ज्योत मी कधी कधी समई कधी नीर…
-
भाव भावना – BHAV BHAAVANAA
लौकिकात मज जगावयाचे भाव भावनांसाठी विनयाने मज झुकावयाचे भाव भावनांसाठी बालक होउन मी मी करुनी भांड भांडण्यासाठी अभिमानाने फुलावयाचे भाव भावनांसाठी सम्यक्त्वाची अंगे अगणित असतिल शास्त्रामध्ये वात्सल्याने भिजावयाचे भाव भावनांसाठी कशास संसाराची भीती अन अभिलाषेचीही चिंब त्यात मज नहावयाचे भाव भावनांसाठी अभिनय करता करता उतरव मार्दव अंतर्यामी उतरवुनी मद बुडावयाचे भाव भावनांसाठी मात्रावृत्त (१६+१२=२८मात्रा)
-
काकतालीय – KAAK TAALEEY
काकतालीय न्यायाने सुख न कुणा मिळते अंतर्दृष्टी ज्याची उघडे सुख त्याला मिळते जीव मुमुक्षू मुक्तीला उत्सुक मिळवाया विपरीतरुपी मिथ्यात्वा परिक्रमा मिळते आस्वादाने प्रत्यक्षे इंद्रिय सुख लाभे शब्दफुलोरा रचल्याने कधीच ना मिळते दगड फेकता शांत तळी वीचिमाला त्यात संकल्पाने विकल्प धन चित्ताला मिळते शरीर सुंदर कुरुप असो व्यक्ती ना तैशी सत्य शिव रुपी चित्ताला सुंदरता मिळते…
-
वाटण घाटण – VAATAN GHAATAN
वाटण घाटण मजेत करतो पाटा वरवंटा सहज फिरे पाट्यावर सर सर माझा वरवंटा पुरण वाटतो कधी खोबरे कधी कधी चटणी हरेक कामामधे साथ दे आता वरवंटा पुरणयंत्र अन मिक्सर सुद्धा हेच काम करती त्यांच्यासम बघ कुशल कितीहा जाडा वरवंटा नका धुण्याला बडवू मजवर म्हणे तुम्हा पाटा बिजली जेव्हा गायब होते काढा वरवंटा हरेक यंत्रासंगे दोस्ती…