Tag: Marathi Ghazal

  • सुरस खरी – SURAS KHAREE

    जमेल तेव्हा ये सवडीने गोष्ट ऐकण्या सुरस खरी रसिक जनांना मनभावन पण तुझ्यासाठी ती कुरस खरी नकोच तोरा मिरची पुढती तीच तिखट अन सरस खरी नकोस गर्जू ओठ फाकुनी नेत्रांमधुनी बरस खरी एक फूलही सुगंध भरले पुरे त्यांचिया साक्षीला हव्या कशाला भेटी वस्तू प्रेमासाठी तरस खरी नकोच स्पर्धा नको परीक्षा नजर भिडव नजरेला तू तुझ्या…

  • छत्री – CHHATREE

    छत्री घेउन निळी निळी फिरायचे मी जळी स्थळी पाऊस धार ये धो धो तुडुंब भरण्या धरण तळी कडेकपारी या धुंडू खळखळणाऱ्या शुभ्र घळी पानापानांवरी हसे प्राजक्ताची कळी कळी श्रावण बरसे रंगसरी इंद्रधनूला मार हळी मात्रावृत्त(१४ मात्रा)

  • यमाई – YAMAAEE

    नजरेमध्ये प्रेम असूदे विषय कशाला वयात अन्तर अंतरात मग प्रणय कशाला भाव भावना भरून वाहे कुठे वास ना वसन लपेटू दहा दिशांचे प्रलय कशाला स्वभाव अपुला जपेल  ‘मी’ रे नको काळजी कधी उसळ अन उर्मट हो तू विनय कशाला मला न भीती अपघाताची अन मरणाची मीच यमाई तुझ्याकडुन मज अभय कशाला अचूक समयी समई विझते…

  • मुक्त हस्त चित्र – MUKT HAST CHITR

    मुक्त हस्त चित्र काढ ओतण्यास त्यात जीव रंगसंगतीस जाण ओतण्यास त्यात जीव वाचणे पुरे अता दिसावयास स्वप्नचित्र गोष्ट तूच ऐक सांग ओतण्यास त्यात जीव गोठ ताप जा ढगात वर्षण्यास शुद्ध नीर बरस चिंब भिजवण्यास ओतण्यास त्यात जीव ये इथे रहावयास आसमंत रम्य क्षम्य बोलुयात खास बात ओतण्यास त्यात जीव प्रेम प्रीत इश्क बिश्क जा बुडून…

  • नको जीव मारू – NAKO JEEV MAAROO

    नको काक मारू नको जीव मारू किनाऱ्यास तारू नको जीव मारू करे पोट पूजा लुटोनी दुकाने जरी तो लुटारू नको जीव मारू उन्हाने जळाली कुणाची पिके अन म्हणे तूस वारू नको जीव मारू तुला सावल्यांचा निवारा मिळाला जलाला फवारू नको जीव मारू तुला आवडे जर पहाया फुलांचा व्हिडीओ शिमारू नको जीव मारू लगावली – लगागा/लगागा/लगागा/लगागा/

  • भुगा – BHUGAA

    अखेर मी गाठलेच त्यांना अखेर मी कोंडलेच त्यांना वरून अक्षत जरी वाटती अखेर मी चाळलेच त्यांना किती खडे पांढरे काढुनी अखेर मी ठेचलेच त्यांना ठेचुन चेचुन भुगा करोनी अखेर मी पेरलेच त्यांना सुगंध मातीतला उधळण्या अखेर मी वाटलेच त्यांना मात्रावृत्त(१६मात्रा)

  • बादल – BAADAL

    बादलीत बरसतोय बादल दलदलीत झिरपतोय बादल बदबद वर्षत रिता जाहला रिक्त मनी पसरतोय बादल दल बदलूनी गिरगिट होतो शेर होत गरजतोय बादल श्वेतश्याम वा कृष्णधवल म्हण शब्द अब्द प्रसवतोय बादल हलका फुलका पुन्हा होउनी निळ्या नभी लहरतोय बादल मात्रावृत्त(१६मात्रा)