Tag: Marathi Ghazal

  • चिडावे रडावे – CHIDAAVE RADAAVE

    चिडावे रडावे परी ना कुढावे मला जे कळाले तुलाही कळावे यमाला सुपारी जरी तू दिली रे तिला चोरुनी मी कुटावे न खावे तुझी जिंदगानी मला खूप प्यारी म्हणोनी सख्या तू पडावे लढावे किती प्रेम माझे अजूनी तुझ्यावर नयन चुंबण्या तू स्वप्नात यावे तुझे मौन गाणे जगा ऐकवाया तुझ्या बासरीचे अधर मीच व्हावे अक्षरगणवृत्त (मात्रा २०)…

  • वृत्त देखणे – VRUTT DEKHANE

    वृत्त देखणे फक्त नसावे वृत्तीसुद्धा हवीच सुंदर गझल असूदे जीर्ण जुनी मम नित्य भासते नवीन सुंदर प्रभातसमयी शुभ्र मोगरा तप्त दुपारी जास्वंदीसम सायंकाळी गझल चमेली उत्तररात्री शिरीष सुंदर काव्य चित्र अन शिल्पामधुनी मूर्त कुणी नारीला करिते त्याहुन मोहक लेक आपुली गझल बावरी सजीव सुंदर आकाशाची निळी पोकळी सौरमंडळे ग्रह ताऱ्यांची पृथ्वी म्हणजे ग्रहगोलांतिल गझल क्षमाशिल…

  • तुला प्राशुनी मी – TULAA PRAASHUNEE MEE

    तुला प्राशुनी मी, तुझे रंग ल्यावे, जिवा ध्यास होता,अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे तुझे अंग माझ्या, जलौघात न्हावे, जिवा ध्यास होता, अता पूर्ण व्हावा,असे वाटते रे कुठेही असूदे, मनाला दिलासा, खरी तूच गझले, तुझी मूर्त माझ्या, समोरी असावी तुझ्या लोचनातील काव्यास प्यावे, जिवा ध्यास होता,अता पूर्ण व्हावा, असे वाटते रे तुझा भास होता, उगा लाज-लाजून…

  • संक्रांतीला लुटू – SANKRAANTEELAA LUTOO

    संक्रांतीला लुटू अक्षरे चला सख्यांनो शब्दफुलांचा फुलवू सुंदर मळा सख्यांनो भेटण्यास या काव्य घेउनी मला सख्यांनो गाउन त्यांना खुलवू अपुला गळा सख्यांनो सुगंध भरण्या रंगबिरंगी मनात कोमल कुसुम कळ्यांसम शिकू नवनव्या कला सख्यांनो घटात भरुनी नीर मृत्तिका प्रेम पेरता निसर्ग होइल मित्र खरोखर भला सख्यांनो तीळ-गुळासह हळदीकुंकू पानसुपारी देउन टळवा कपोलकल्पित बला सख्यांनो जादूटोणा बलीप्रथेचा…

  • मम हृदयाची – MAM HRUDAYAACHEE

    मम हृदयाची सतार वाजे दिडदा दिडदा अन गझलांची सतार वाजे दिडदा दिडदा मनापासुनी पोळ्या लाटे आई जेव्हा तिच्या करांची सतार वाजे दिडदा दिडदा वृत्त वेगळे जुना काफिया रदीफ घेउन शब्द शरांची सतार वाजे दिडदा दिडदा अंतरातले भाव सांगण्या मते मांडण्या मृदुल जिव्हांची सतार वाजे दिडदा दिडदा बिजलीचा कडकडाट होता वादळराती कृष्ण घनांची सतार वाजे दिडदा…

  • सुनेत्रा – SUNETRA

    नाम रेखिते श्यामल भाळी टिळा लाविते गौर कपाळी भालप्रदेशी चंद्रकोर अन शुक्राची चांदणी सकाळी झाड उभे हे ध्यानासाठी मांजर म्हणते पुरे टवाळी नदीतटावर उभी राधिका शोधायाला घागर काळी दिवा लाविता अंतर्यामी म्हणे सुनेत्रा हीच दिवाळी मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)

  • रंगत गेल्या पुन्हा मैफिली – RANGAT GELYAA PUNHAA MAIFILEE

    रंगत गेल्या पुन्हा मैफिली दूर जरी तू माझ्यापासुन माथ्यावरती तुझी सावली दूर जरी तू माझ्यापासुन रखरखणाऱ्या उन्हातसुद्धा छायेमध्ये तुझिया आई भिजली पाने सर्व चाळली दूर जरी तू माझ्यापासुन भेट न आता प्रत्यक्षातिल ठाउक आहे म्हणून मी तव फोटोमधली छबी वाचली दूर जरी तू माझ्यापासुन करुणामय दो नयनांमधुनी फक्त प्रेम अन प्रेमच बरसे हाच दुवा अन…