Tag: Marathi Ghazal

  • चळवळ – CHALVAL(movement)

    पुन्हा नव्याने सुरू करूया चळवळ जैनत्वाची शुद्ध जाहल्या जलात उठुदे सळसळ जैनत्वाची विशाल व्यापक जाणिव जागृत धर्मामध्ये असण्या नको नाटकी अता वहाया भळभळ जैनत्वाची बौद्धत्वाचा हिंदुत्वाचा ब्राम्हण्याचा हेका सैल करावा सुखद वाहण्या झुळझुळ जैनत्वाची शीख पारशी मुस्लिम ख्रिस्ती अपुले बांधव हे त्यांच्यासंगे निर्झर व्हावी खळखळ जैनत्वाची क्षात्रतेज अन छात्र गुरूंचा मस्त मराठी बाणा तीर अक्षरी…

  • एलोव्हेरा -ALOEVERA

    नाजुक साजुक एलोव्हेरा म्हणते भारत माझा मेरा बर्फाविन मज दे इक्षूरस चषकामध्ये सुंदर येरा पुर्वेवरती अरुण उगवला प्रभात म्हण वा त्यास सवेरा सूर्योदय होताच धरेवर वाहन माझे निघे तवेरा बोट दाखवुन यू यू म्हणशी म्हणे ‘सुनेत्रा’ घालच फेरा

  • शेष – remainder

    रंगले जरी कधी रंग ना मी उधळले फक्त प्रेम ठेवुनी शेष काही विसरले तुझ्याच आठवात मी दंगले पुन्हा पुन्हा तुलाच शोधले पुन्हा जरी कधी हरवले फुलापरी हसत मी चालले तुझ्यासवे घसरता चुकून पाय हात फक्त पकडले पुरेच खेळ हा सख्या कोसळू अता पुरे म्हणत म्हणत मी तुला हळूहळूच बरसले नाव मी तुझे खरे जपून ठेवले…

  • उनाड – UNAAD (vegabond)

    सांग मला भेटण्यास त्या उनाड पारव्यास अंतरात साठवून प्रेम उतर नाचण्यास ये इथेच राहण्यास पावसास पाडण्यास भीत नाय मी कधीच आषाढी गारव्यास भाग पाड लबाडास खरे तेच बोलण्यास मोल असे जाण अता गात गात खिदळण्यास जन्म घे पुन्हा पुण्यात सुनेत्रास हरवण्यास

  • यंत्रयुग – YANTR YUG (the machine age)

    पोट झडाया डोकयंत्र हे ते सोकविण्या मन सोकयंत्र हे ते टोक कराया टोकयंत्र हे ते पाठ कराया घोकयंत्र हे ते विनोद सांगे जोकयंत्र हे ते हळू टोचण्या पोकयंत्र  हे ते नशा यावया झोकयंत्र  हे ते चोप द्यावया फोकयंत्र  हे ते मागे ओढी ढोकयंत्र  हे ते इंजिन पळवी कोकयंत्र  हे ते दिशा सांगण्या होकयंत्र  हे ते…

  • कीर्द खतावणी – KEERD KHATAAVANEE (journal or ledger in accounting and book keeping)

    कुणी कुठून आणली कीर्द खतावणी फुका पुसे खडूस बोचरे प्रश्न असे तसेच का हवीस तू मला गडे बोलतसे फुलास तो अशाच सांगुनी कथा रमवतसे स्वतःस का कधी उशीर जाहला फी तुज द्यायला मला उगाच चौकशा करी सांग मिळे पगारका हिशेब छान शिकविले शिस्त जरी कडक असे हुशार मी खरी खरी जाणुन गोष्ट मौन का गुरूपणा…

  • बाकी – BAAKEE (remaining)

    काय राहिले सांग प्रियतमा लिहावयाचे बाकी किती राहिले पत्थर अजुनी भिजावयाचे बाकी दगडावरती साठत गेली बांधावरची माती बोल केवढे अंकुर आता रुजावयाचे बाकी कैक भरवल्या खतावण्या तू लिहून भाकड गोष्टी पात्र कोणते कथांतल्या त्या रडावयाचे बाकी चंचलपण तव नकोस मिरवू उघड चंचले चंचू उकरुन माती टाक पुरून जे पुरावयाचे बाकी पोपटपंची नको नाटकी पूस ‘सुनेत्रा’…