Tag: Marathi Ghazal

  • हवेहवेसे जे जे वाटे ते ते माग फुला – WHAT YOU WANT YOU WILL GET

    In this Ghazal the poetess asks a flower or a kid to demand everything it wants. This Ghazal is written in 26 matras. हवेहवेसे, जे जे वाटे, ते ते माग फुला ; गोळा-बेरिज, हवी  कशाला, पूर्णच भाग फुला. नकोच गुणणे, आणि मिळवणे, नको वजाबाकी; भागुन भागुन, मिळेल उत्तर, बाकी त्याग फुला. सखे सोबती, घरकुल  दे…

  • पहिली गाडी – FIRST TRAIN

    This Ghazal is written in matravrutta. This ghazal is written in 16 (sixteen) matras. अस्सल होती म्हणून टिकली अती निरागस म्हणून फसली म्हणू नका तिज अशी कशी तू सारे फसले तीही फसली प्रश्न मला का अजून पडतो माझी पहिली गाडी कुठली उतरत असता होते गडबड खरे खरे पण खोटे पडली घडवत घडवत सारे सुंदर थकली नाही…

  • फुले – FLOWERS

    अता वेळ कोठे दुपारी मला रे नको दावू आता हुशारी मला रे जरी ना कळाली न कोडी न चाली तरी तेच म्हणती जुगारी मला रे फुले तू दिलेली किती भावली ही परी आवडे ती सुपारी मला रे फुले चुंबण्याचा  मला शौक भारी म्हणोनी म्हणावे कुमारी मला रे ‘सुनेत्रा’ शराबी पुरी झिंगली अन कळाली नशेची खुमारी…

  • स्पंदन – VIBRATION

    मौन त्यागण्या, हितचिंतक वा, होउन चिंतक भेट मला तू काष्ठ जरी तू, हृदयशून्य घन, होउन निंदक भेट मला तू वादळ पिंजुन, तरल जाहले, होउन चंपक भेट मला तू गुलाब मी जर, रक्षण करण्या, होउन कंटक भेट मला तू उन्हामधे मी, मोजत तारे, जागी असुनी स्वप्न पाहते कोसळले जर, उल्केसम मी, होउन खंदक भेट मला तू…

  • भरती आली – TIDE CAME

    भरती आली आज पुन्हा तुझी ऐकता गाज पुन्हा मौन सोडुनी खळखळुनी झऱ्यासारखे वाज पुन्हा मनात श्रावण गर्भ हसे लेइन हिरवा साज पुन्हा धो धो बरसत ये वळिवा उन्हात लाह्या भाज पुन्हा भिजेल माती, वाळूही अमृत त्यांना पाज पुन्हा खास ‘सुनेत्रा’ नेत्र तुझे दाव तयांचा बाज पुन्हा