Tag: Marathi Ghazal

  • संयम -SANYAM(PATIENCE)

    क्षमा मार्दवाचा मणी रत्नत्रय हृदय आर्जवी लावणी रत्नत्रय शुचित्त्वात सत्याग्रही संयम धर तपे त्याग मूर्ती गणी रत्नत्रय लगागा लगागा लगागा लललल अकिंचन्य धर्मी फणी रत्नत्रय कळस मंदिराचा दहा ब्रह्मचर्य करे भादवा पेरणी रत्नत्रय जिनालय सुनेत्रा स्मरुन हात जोड जिनांच्या कपाटी खणी रत्नत्रय

  • ढाल – DHAAL(SHIELD)

    अस्तित्त्वावर श्रद्धा ठाम निश्चय व्यवहाराचा साम मम तत्त्वांची हृदयी ढाल जीव लेखणी करते काम स्वाध्यायाचा मज आधार अंतर्यामी आत्माराम गृहस्थाश्रमी संसारात कर दोन्ही प्रिय उजवा वाम नऊ रसांचा घेउन स्वाद शांत रसाचा सांडे जाम जिनबिंबाची सुंदरता सत्य शिवाचे मंदिर धाम गुणानुरागी जिनधर्मात लीन सुनेत्रा पूर्ण विराम

  • कोपरखळी – KOPAR KHALHEE (NUDGE)

    गालावरची खळी दिसावी तमात कैशी डोहात जळी अळी दिसावी तमात कैशी लावून नजर ढगात कोणी बसेल जेंव्हा पानात मुकी कळी दिसावी तमात कैशी बिंदू नुक्ता टिळा कुळाचार तीट नसता गझलेत गज़ल दळी दिसावी तमात कैशी घेता सल्लेखना नदीने खड्या पहाडी खोऱ्यातिल जावळी दिसावी तमात कैशी चपलेने छिंदता निळाई नभांगणाची लाजूनी जांभळी दिसावी तमात कैशी हातांनी…

  • शकट – SHAKAT(WAGON)

    शकट प्रगट म्हणो वा प्रकट कुणी पण अर्थाचा ना अनर्थ ल्यावा व्यूह म्हणो वा शकट कुणी पण अभिमन्यूचा जीव न जावा अर्थांचे झिरझिरित पदर जरी अर्थ त्यातुनी नेकच घ्यावा झिमझिम रिमझिम श्रावण सावन मन भावन सर्वांना व्हावा …. कटी श्रावण वा आषाढ असूदे निर्झर बाला मुक्त खळखळे उथळ पात्र वा खंदक खोली समीर वारा गात…

  • पागोळ्या – PAGOLYA(EAVES)

    दंडावर कुळकुळीत काळ्या भुंगा ठोळ्या अवघडली लेखणी करातिल भरून झोळ्या उभ्या उभ्या भाजून भाकऱ्या डबे भरुनी ग कामाला बिगिबिगी चालल्या बाया भोळ्या कथा समीक्षा चित्र काव्य धन लुटावयाला आंतरजाली टोळधाडीसम आल्या टोळ्या पुण्याईची घागर सांडे आभाळातुन ओंजळीत तव जीव जपाया धर पागोळ्या दक्ष सजग मी सदा सर्वदा व्यवहाराला मुक्तक मेवा गझल रुबाई मम चारोळ्या हत्ती…

  • मराठी – MARATHI (State language of Maharashtra State)

    काल वचन मम जिन धाम सई आज कवन मम जिन राम सई काय उद्या मन चिंतेल बरे प्रश्न स्तवन मम जिन दाम सई मी न करे चिंता व्यर्थ सयी उत्तर घन मम जिन साम सई राग असा अनुरागी असता खास भजन मम जिन काम सई नार लगागा गाळ उपसते नगन वसन मम जिन श्याम सई…

  • जिनधाम – JIN DHAM (JAIN TEMPLE)

    वाट असूदे अथवा वाद जीव जगविण्या देते साद कर्मधर्म संयोग घडून अंतरातला ऐकू नाद गझल झरतसे कंठातून म्हणता मी मजला इर्शाद चरणांवर शेरांची रास सर्वार्थ सिद्धी पूज्यपाद मुनी दिगंबर मन जिनधाम देय “सुनेत्रा” सुंदर दाद !