Tag: Marathi Ghazal

  • मैत्री – MAITREE (friendship)

    In this Ghazal the qualities of a true friendship are described. मैत्री माझी बंधन नाही पण जुळलेले कर मैत्री प्राजक्ताच्या देठावरल्या दवबिंदुचा सर मैत्री मधुरा-भक्ती अबोल प्रीती वत्सल नाती जपावया मृदेत भिजल्या बकुळ फुलांच्या प्रेमाचे अत्तर मैत्री एकांताच्या बाकावरचे  पारावरल्या गप्पांचे चिवचिवणाऱ्या आठवणींचे गजबजलेले घर मैत्री पहिली मैत्री पहिली प्रीती पहिले जे जे शुद्ध खरे…

  • कर्म निर्जरा – KARM-NIRJARAA (removal of accumulated karma from the soul)

    डोळ्यांस पाजुनी भांग, मी प्रेम न तुजवर केले पाण्यात पाहुनी सांग, मी प्रेम न तुजवर केले पोळ्या न भाजल्या लष्करी, सोडून कामधंदा कामास देउनी टांग, मी प्रेम न तुजवर केले घडवून वेगळी वाट, नेटाने चालत गेले मोडून नेटकी रांग, मी प्रेम न तुजवर केले धोंड्यास फोडुनी सूक्ष्म, मी कर्म निर्जरा केली गर्वात फेडण्या पांग, मी…

  • पुठ्ठा – PUTHTHA (cardboard)

    तुज घालण्यास वारा, पुठ्ठा कशास आता अन मिळविण्यास पैका, सट्टा कशास आता प्रेमात चिंब हो रे, वाहू नकोस ओझे स्वप्नांचे बंडल घे, गठ्ठा कशास आता तापला तवा त्यांचा, उदक सोडना त्यावर गवसेल तुला ऋद्धी, रट्टा कशास आता आकाश चांदण्यांचे, ते दुरून लखलखते दिवा लाव तू गगनी, बट्टा कशास आता हे पुत्र गुंड माझे, बघ पाजणार…

  • उपडी घागर – UPADI GHAGAR (UPSIDE DOWN PITCHER)

    This muktak or chaarolee is writeen in twenty-four maatraas. Here radif is Vatate aahe(वाटते आहे) and kaafiyaas are kilas, palas, kalas. कोणास भावनेची किळस वाटते आहे कोणास वासना ही पळस वाटते आहे पाण्याविना धरेचे देऊळ तापलेले त्यावर उपडी घागर कळस वाटते आहे

  • गुणाची वेल – (A VINE OF VIRTUES)

    In this Ghazal flowers symbolize children. Here poetess says, we should take good care of children. Let us not crush the innocence in children. Let them grow and flourish like flowers. Don’t let the destructive forces affect children. Let them live their beautiful life. This ghazal is written in akshargan vrutt. Vrutt is LA GAA GAA GAA,…

  • वनवास तुझ्यासाठी – VANVAAS TUZYAASAATHEE (EXILE FOR YOU)

    This Ghazal is written in twenty-six(26) maatraas. Radif is ‘Tuzyaasaathee'(तुझ्यासाठी) and kaafiyaas are shvaas, khaas, dhyaas etc. करी लेखणी, माझी आहे, श्वास तुझ्यासाठी; पापणीतुनी, गझल उतरते, खास तुझ्यासाठी. अधरांचे हे, बंड म्हणू की, संयम वा खुन्नस; जरी लपविले, नाव तुझे पण, ध्यास तुझ्यासाठी. नेत्री भरते, घागर काळी, मोत्यांचे पाणी; पाणीदार या, मोत्यांची रे, रास तुझ्यासाठी.…

  • उत्तम शिल्प – UTTAM SHILP (SUPERIOR SCUIPTURE)

    This Ghazal is written in eight(8) matras. दिवा विझव तू काव्य प्रसव तू उत्तम सुंदर शिल्प घडव तू मुग्ध निरागस कळी फुलव तू प्रेम प्राशुनी गझल बनव तू भरल्या पोटी धर्म शिकव तू होण्या जेता मला हरव तू तुझे ‘सुनेत्रा’ नेत्र सजव तू