Tag: Marathi Ghazal

  • शुभ्र चांदणे निळसर अंबर – SHUBHRA CHANDANE NILASAR AMBAR

    शुभ्र चांदणे निळसर अंबर माझे दादा वसुंधरेवर हसरे झुंबर माझे दादा जरी भासती भोळा शंकर माझे दादा करतिल आता जंतर मंतर माझे दादा माणसातुनी देव घडविती संत-महात्मे फुलांस जपती फोडुन कंकर माझे दादा प्रेमासाठी देशासाठी हटून मागे जिंकतील सत्याचा संगर माझे दादा किती गोरटे किती देखणे रुबाब करतिल खरे हेच पण जगात सुंदर माझे दादा…

  • कोजागिरी मी दवात न्हाते – KOJAGIRI MEE DAVAT NHATE

    In winter season Indians celebrate Shradiy pournima. It is also known as ‘Kojagiri pournima’. Pournima means full-moon-day. On this night, friends and family members come together. They drink basundi(masala milk) after seeing an image of full moon in that milk. This night is very pleasant night. In this poem the poetess says that, ‘When my…

  • प्रेम माझे – PREM MAZE

    प्रेम माझे फूल आहे; पारदर्शी कूळ आहे. भाकरीचा चंद्र भाजे, पेटलेली चूल आहे. बहरणाऱ्या वृक्षवल्ली; बी-बियाणे मूळ आहे. भावनेची नेत्रभाषा; नियम आहे रूल आहे. घाव घाली जे मुळावर; शस्त्र कसले टूल आहे. प्रीत-काव्ये चुम्बिणारी; पाकळ्यांची झूल आहे. मागुनी मी घेतलेला; शब्दवेडा शूळ आहे. सागराचे दो किनारे; जोडणारा पूल आहे. पौर्णिमेच्या चांदण्यांची; बरसलेली भूल आहे. विरघळे…

  • भावना – BHAVANA

     मुग्ध निरागस मधुर भावना, कळली नाही कळीस  कारे? निघून गेला शीळ घालुनी, अवखळ चंचल तो वारारे! भावगीत ते कळले नाही, म्हणून झुरते झुळूक आता; गंध प्राशुनी आज तयातिल, बनली आहे ती कवितारे! नकोच होऊ तू परमेश्वर, देवघरातिल पुतळा बनण्या; माझ्यासम तू मानव हो रे, माझ्यासंगे फुलावयारे! पुरे परीक्षा या मातीची, पाणीसुद्धा रंग बदलते; तुझी कसोटी तुला…

  • झालर काळी – ZALAR KALI

    पापणीस तव झालर काळी थरथरणारी अतीव सुंदर नकोस मिटवू उघड पाकळ्या कमलदलांसम सजीव सुंदर कधी वाटते खूप रडावे कारण त्याचे नकळे मजला अश्रु-विमोचन करता फुलते अंतरातली उणीव सुंदर मन घाबरते वादळ येता मेघ सावळे मनी दाटता कोसळतो मग तांडव करुनी हवाहवासा वळीव सुंदर शीळ घालतो अवखळ वारा श्यामल शीतल मेघ नाचरे बरसुन विणती अवनीवरती मोर…

  • घर कौलारू – GHAR KOULARU

    ओठांमध्ये पालवलेले बोलायाचे आहे मजला चित्रामध्ये आठवलेले रेखायाचे आहे मजला चितारते मी सागर नयनी मिटते डोळे गाज ऐकुनी डोळ्यामध्ये रंगवलेले वाचायाचे आहे मजला रंग-गंध वेचून फुलांचे मधुसंचय मी करित राहिले श्वासामध्ये साठवलेले प्राशायाचे आहे मजला शेकोटीची उब जांभळी शब्द कापरे तप्त जाहले काव्यामध्ये तापवलेले ओतायचे आहे मजला तव झुळकीने मोहरलेल्या कळ्याफुलांचे मुग्ध रंग हे हृदयामध्ये…

  • चांदोबा – CHANDOBA

    ती कशास हे काळिज चाळत बसते अन स्वप्नांचे दुकान मांडत बसते ती स्वप्ने ओली चुलीत ना जळती मग त्यांना ती उन्हात सुकवत बसते जाऊन पुन्हा मी लिंबोणी मागे तो चांदोबा नभात शोधत बसते हे शब्द नाचरे फिरती अवती भवती मी शिताफिने गळात ओढत बसते ती मूढ ‘सुनेत्रा’ मौन घेतसे म्हणुनी मी ओठांना तोरण लावत बसते