-
चहा – CHAHA
नको अवेळी चहा सख्या वेळ जरा तू पहा सख्या नाते अपुले नको असे तीनावर जणु सहा सख्या या जगण्याची लज्जत घे वाफ होउनी वहा सख्या मी प्याला की नीर मधुर माझ्यातच तू रहा सख्या वाळ्याचे मी सरबत रे गंधामध्ये नहा सख्या
-
सचैल काया – SACHAIL KAYA
Akasharganvrutta used in this Ghazal is LA GAA,LA GAA GAA, LA GAA, LA GAA GAA. Kafiyas used in this Ghazal are Bhijaya, Firaya, Dharaya etc. सुकून पुन्हा नको भिजाया उन्हात जारे अता फिराया जलात दिसता कुणी पुसटसे कशास जाते तया धराया फुलात आहे लपून कोणी अबोल प्रीतीसम भिजवाया तृषार्त हरिणी फसेल म्हणुनी मृगजळ लागे पहा…
-
बोल कंकणातले – BOL KANKANATALE
Akasharganvrutta used in this ghazal is GAA LA GAA LA, GAA LA GAA, GAA LA GAA LA, GAA LA GAA. ऐकते सख्या तुझे बोल कंकणातले पाहते सख्या तुझे बिंब आरशातले मी जरी मुकी मुकी ओठ घट्ट दाबुनी डोलतात कुंडले श्वास कुंडलातले कुरळ कुंतलांवरी भाळलास तू जरी मोजते पुन्हा पुन्हा वार काळजातले वाहतात नेत्र हे बोलतात…
-
अर्थ सांगू कसे मी कुणाला? – ARTHA SANGU KASE MEE KUNALA
पावलांनी इथे का वळावे ? डोळियांनी असे का झुकावे? भेट झाली खरीना तरीही, गीत ओठी कशाने फुलावे! मी न माझी कुणीरे! कुणाची ? प्रश्न वेडे मला का पडावे ? टाळले आसवांना तरीही आज गाली हळू तू फुलावे! अर्थ सांगू कसे मी कुणाला? श्वास माझे तयांचे पुरावे वृत्त- गा ल गा गा, ल गा गा, ला…
-
कवच-कुंडले – KAVACH-KUNDALE
In this Ghazal the poetess describes ten best virtues in human beings. क्षमा धर्म हा पाया उत्तम या झाडाची छाया उत्तम मार्दव माझे मम गझलेसम चिंब चिंब भिजवाया उत्तम आर्जव म्हणजे सरल-तरल मन मस्त मोगरे जाया उत्तम सत्य शिवाहुन सुंदर असते पुरते कळले राया उत्तम संयम म्हणजे जणू कस्तुरी अत्तरातला फाया उत्तम शौच म्हणा वा,…
-
पहिली गाडी – PAHILI GAADI
In this Ghazal the poetess says, only our soul is pure. मिरवाया भाळावर टिकली गीते माझी तुजला दिधली वाट पाहुनी तुझी सख्यारे डोळ्यांमधली स्वप्ने निजली उभ्यानेच मी प्रवास केला माझी पहिली गाडी चुकली डोहाळे ना मज गोडाचे हवी हवीशी खमंग चकली केवळ आत्मा शुद्ध सुनेत्रा शुभ-अशुभाचे ही फळ नकली
-
होळी अशी जगाची – HOLI ASHI JAGACHI
In this Ghazal the poetess says, Now I am free. I don’t want to find out the answer within the question. I want to live life truly. कसलाच छंद आता मज बांधणार नाही हृदयी असेल घुंगरू मी नाचणार नाही मी फोडले असेका ते वाजले असे का प्रश्नात उत्तरांना मी शोधणार नाही डोळ्यात सांडलेले तू चांदणे…