-
आरक्त – AARAKT
लोक हे दिसले न पूर्ण विरक्त मजला वाटले काही तरी पण सक्त मजला प्राशुनी माधुर्य गझले पश्चिमेसम सांजसमयी व्हायचे आरक्त मजला जोगवा मागे न पाळे मी तिथीही का तरी म्हणतात कोणी भक्त मजला आवडे मज मम मुठीतुन विश्व बघणे मौन म्हणते राहुदे अव्यक्त मजला ही बरी की ती सुनेत्रा काय सांगू जी खरी ती भावते…
-
लगा गालगा – LA GAA GAAL LA GAA
कुणी चेचले सांग तुला कुणी पाडले सांग तुला नकोसे तुझे हे जीवन रे कुणी टोचले सांग तुला लगागा लगा गा गालल गा कुणी फिरवले सांग तुला असे वागणे सोड बरे कुणी ठोकले सांग तुला मुळे पकडुनी घट्ट रहा कुणी पकडले सांग तुला लगा गालगा गाल लगा कुणी वाचले सांग तुला सुनेत्रातले अर्थ खरे कुणी दावले…
-
टायर – TAAYAR(TYRE)
कधी कधी मी असते टायर कधी फुटूनी उडते टायर एक रिटायर टायर दिसता कधी नवे मी बनते टायर एक रिटायर एक स्टेपणी कधी असे पण म्हणते टायर काय लागते शेर लिहाया कधी गझल मग लिवते टायर मक्ता लिहिणे बरे सुनेत्रा कधी गुरूला स्मरते टायर
-
छडी – CHHADEE
अंध गुढीची छडी अंध पिढीची छडी दे दे फेकूनिया अंध रुढीची छडी
-
नेलकटर – NAIL CUTTER(NEL KTAR)
जुना पुराणा नेलकटर गोष्ट खरी सांगेल कटर जुना पुराना नेलकटर चेहऱ्यास चाटेल कटर जुना पुराणा नेलकटर नजर कोठडी जेल कटर माय राज मी शक न म्हणत बेशक शक काटेल कटर कापुनही जो जुळवेलच तोच मुला भावेल कटर मला नि मल्ला यात फरक काय तुला कळवेल कटर अर्धेमुर्धे ब्लेड नको म्हणून तुज टाळेल कटर नकली लज्जा…
-
कृपाळा – KRUPALA
पावसाळा मेघ काळा भिजत राही मुक्त टाळा कुंडल्यांचे स्तोम जाळा रोग टळण्या नियम पाळा अक्षरांना नीट गाळा कलम किल्ली मी कृपाळा उघडला मम कनक टाळा
-
धन्य श्रेणिका – DHANY SHRENIKA
धन्य श्रेणिका तुझी चेलना भावशुद्धिची देय प्रेरणा कोद्रूचा आहार दिल्यावर शृंखलेतुनी मुक्त चंदना त्रिशलानंदन सिद्धार्थाचा महावीर तीर्थंकर श्रमणा महावीर प्रभु मुनिसंघातिल प्रथम अर्जिका तिला वंदना ज्येष्ठेसह साध्वी भगिनींप्रति कृतज्ञतेची नित्य भावना घोर अंगिरस अरिष्टनेमी मुनी दिगंबर वायूरशना जिनधर्माची ध्वजा फडकुदे गिरनारावर हीच कामना