-
कोवळे – KOVALE
-
अभिजात – ABIJAAT
काढ्यात औषधाला सुद्धा कषाय नाही घर सारवू कशाने गोठ्यात गाय नाही भोके जरी खिशाला पॅंटी जुन्याच भारी सदऱ्यास कोण येथे बांधीत टाय नाही टाटा अजून टिकुनी गावी मिठामधेही खुर्चीत कैद मंत्री पळण्यास पाय नाही गाठीस पुण्य भावा अन पातळास ठिगळे गावात गझल कट्टा पण वायफाय नाही अभिजात मायबोली असुनी तुझी सुनेत्रा तुझिया मराठमोळ्या गझलेस न्याय…
-
खस्ता – KHASTAA
-
सवाई – SAVAI
जाहली शेरास सव्वा शेरणी दासी न आई धन्य पन्ना वाचलेली जाहली माझी रुबाई मुक्तकाच्या चार ओळी गात लिहिते ना लगावे गालगागा चार वेळा मी सुनेत्रा रे सवाई गालगागा गालगागा गालगागा गालगाई माळते कंठात कंठा लेखणी नाही कसाई ठेवते शेरावरी ह्या पावशेरा शर्वरी मम कंटकांनी वेढलेली पार करण्या खोल खाई आठमध्ये दोन जादा मिळवता दाही दिशांनी…
-
बिजली – BIJALEE
-
व्यास – VYAAS
तीन मुक्तके … व्यास .. पाय जरी नव्हते राजी जावयास पुढती ठाम निश्चयाने केला पार व्यास पुढती मुक्तकास श्वासच करती पूर्ण मम सुनेत्रा ऊर्ध्वगती वेडापायी पदन्यास पुढती क्षमता .. पाऊस पडतो जलद भरता वर्षा बरसते मळभ गळता बाराक्षरांचे काव्य गोमटे काव्य सिंहकटी दिव्य क्षमता काळिमा .. रणरणत्या उन्हात झळाळत कोण उभे खळखळ निर्झरात खळाळत कोण…
-
चैतन्य विभोर – CHAITANYA VIBHOR