-
साडीवाली – SAADEE VAALEE
आली आली साडीवाली आली खाली साडीवाली हिजडे छक्क्यांना जगवाया आली वाली साडीवाली दो हातांनी ठोकत टाळ्या आली खाली साडीवाली खड्डे खळगे मिरवित पाडित आली गाली साडीवाली निर्झर खळखळता होऊनी आली नाली साडीवाली सुटला साडीवाला तेंव्हा आली झाली साडीवाली अधरांवरती गालांवरती आली लाली साडीवाली हळदीकुंकू टिकली लावुन आली भाली साडीवाली संवादास्तव बोलत भाषा आली पाली साडीवाली…
-
लोंढा – LONDHAA
धादांत खोटे बोलले मी पण क्लांत खोटे बोलले मी कोंडीत लोंढा दाटलेला मन शांत खोटे बोलले मी जे जे हवे ते प्राप्त होता मज भ्रांत खोटे बोलले मी अज्ञान माझे दावण्यास्तव ते प्रांत खोटे बोलले मी बोंबा खऱ्या होत्या जरी त्या आकांत खोटे बोलले मी
-
गझलमणी – GAZAL MANEE
जादुगार सोन्यासम पिवळा,करांगुलीवर नीलमणी.. खरा दागिना हेमंताचा,झळाळणारे शील मणी… सोन्याचे मी मणी गुंफिता,जुन्याच धाग्यामधे पुन्हा.. कनक मण्यांच्या माळेमध्ये,झाले नव सामील मणी … गळ्यात काळी पोत मण्यांची,मोजले न मी मणी जरी… अजून कांही आले तेंव्हा,करण्यासाठी डील मणी… आई माझी शिरोमणी जणु ,कधी न गळले अश्रु तिचे… मोरपिसांसम मायेच्या मज,तिच्या सयी सच्छील मणी… स्फटिक मण्यांची माळ जपाची,मणी…
-
चरखा – CHARKHAA
न पिते न खाते का बाई हरवून जाते का बाई चरखा फिरवुनी सूत जमे तेंही न काते का बाई पाऊस येता शब्दांना विसरून गाते का बाई फसवून पळवे प्रीतीला फिरवून नाते का बाई फिरवीत बसते कलम नवे घासून पाते का बाई
-
तिप्प शांत – TIPP SHANT
नखशिखांत मी यशात न्हाले मज न भ्रांत मी यशात न्हाले गीत लिहितसे स्वतंत्रतेचे हृदय प्रांत मी यशात न्हाले उदकचंदनी नऊ रसांसह तिप्प शांत मी यशात न्हाले मेघ जलद वा बनून जलधर घन सुखांत मी यशात न्हाले रंगवून मम अलक सुनेत्रा गझलकान्त मी यशात न्हाले शब्दार्थ तिप्प – तृप्त सुखांत – सुखी शेवट अलक – अती…
-
पार लेखणी – PAAR LEKHANEE
लेखणी शमा रमा कमल कुसुम ठाकले शेर चंद्रमा निशा दार जाम लागले मुक्तकात भूप तो राग गातसे कुणी साथ देश ईश्वरी पार होत हासले
-
चंद्रार्क तनु – CHANDRAARK TANU
जिनसूर्य तू जिनचंद्र तू जिनबिंब तू मम अंतरीच्या भावरंगी चिंब तू मी मोजते ना बीजपंक्ती अर्थदा आरक्तवर्णी फाकले डाळिंब तू उत्सर्पिणी अवसर्पिणी काळातल्या चंद्रार्क तनुवर सिद्धस्वरुपी टिंब तू नांदावया अंकांसवे स्वर अक्षरे काट्यांत मी जो नेसले तो लिंब तू दाटून अंतर गीत झरता भावना ग्रंथीत उरले बीजरूपी डिंब तू वाळून जाता शाकभाज्या माळवी घोळून तिखटी…