Tag: Marathi Ghazal

  • सुनीत – SUNEET (SONNET)

    शीक वाटण्या मुला चुलीत तू करायला शीक भेद ना मुलामुलीत तू करायला शीक दंभ ढोंग सोंग चीत तू करायला शीक गझलचे सुलभ सुनीत तू करायला ..हुसने मतला – अक्षरांस जोडुनी कवीच शब्द बनवितो शीक शब्द वळत गोल गीत तू करायला आग कोंडुनी सदैव नेत्र लाल लाल हे शीक उष्ण भावनांस शीत तू करायला नेक काम…

  • सूत्रबंधनी श्लोक- SUTRA BANDHANI SHLOK (A VERSE))

    धो धो हसण्या खळखळुनी जन निरोग निर्मल जोक हवा सृष्टीचे गुणगान गावया स्वर सैराटी झोक हवा अज्ञातातिल स्वर्ग सुखे या मनास नच रे लोभवती इथल्या बांबू बनात फिरण्या हवा हवा इहलोक हवा शौक भू वरी मम जीवाला ऊर्ध्व गतीचा जरी जडे स्वतः स्वतः झरणारा निर्झर शोक मुक्त निर्धोक हवा स्वरानुभूतीतिल तत्त्वार्थी चिंब भिजवुनी गाणाऱ्या पाठीवर…

  • समर्थ -SAMARTH (CAPABLE)

    मातृ पितृ धर्म ऐक्य सहज लक्ष्य आहे माझिया करात फिरवण्यास अक्ष आहे साक्ष द्यावयास आस श्वास हजर असता तोलण्यास शब्द अर्थ भाव दक्ष आहे बोलती जरी असत्य सत्य त्यास म्हणती वादळात कातळी तटस्थ वक्ष आहे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष सौरवर्ष सांगे कोणता खरेच नित्य शुद्ध पक्ष आहे मी समर्थ रक्षिण्यास आत्मधर्म माझा प्रार्थनेत पण तुझ्याच…

  • अलकनंदा – ALAK NANDA (NAME OF RIVER)

    आनंद कंद बाणा चित्रात मंजुषेच्या ज्योती समान गाथा चित्रात मंजुषेच्या आहे प्रवीण दुहिता..नृत्यात अलकनंदा गाते सुरेल माया चित्रात मंजुषेच्या उत्फुल्ल रंजनेने घनदाट कुंतलांवर बघ माळलीय फांती चित्रात मंजुषेच्या ओढाळ माधुरीला रेखा कशी कळावी आहे निमात नीती चित्रात मंजुषेच्या संध्येस स्वप्न भारी फिल्मी नवी सुजाता स्वातीस मोतिमाला चित्रात मंजुषेच्या कविता न चारुशीला आकाश नीलिम्याची मधुमास चांदण्यांचा…

  • उधारी – UDHAARI (BORROWING)

    मादक ओठांवरची मदिरा प्राशायाला हवी झिंग तयातिल चालीमध्ये मुरवायाला हवी स्पर्शाने मम उसळुन येता तव इच्छांचे नीर दो हातांनी लाट रुपेरी अडवायाला हवी मधुर गुपित चिरतारुण्याचे कळण्या मजला खरे तव नजरेतिल तडका मिरची चाखायाला हवी मिटशिल जेंव्हा नेत्रदलांना श्यामल तनूवरचे.. साठवुनी दव त्यातच मेंदी भिजवायाला हवी कुणास वाटे चोरी मारी असली तरही गझल.. कल्पकतेची म्हणे…

  • धैर्यशाली – DHAIRYASHALI (BOLD)

    काजळीने काजळे ना रात आता खुट्ट होता हलत नाही पात आता त्या दिव्यांची जात नाही माळण्याची माळती पणत्या खुशीने वात आता झोपती बाळे सुखाने शांत चित्ते अंधश्रद्धा रडत नाही गात आता काय सांगू भोवतालीच्या बघ्यांना दैव घडवे धैर्यशाली हात आता वात कोमल कापसाची मम सुनेत्रा तूप साजुक भिजविते स्नेहात आता

  • कळ – KAL (KEY))

    पल्लवित मन झाले तरुचे सुमन सुकले काळे तरुचे भाव घन अंबर धर नभ हे थोपवित शर भाले तरुचे वाऱ्यात सळसळत्या पाती वाजतात ग वाळे तरुचे दवबिंदूं चे करित शिंपण पूजन अर्चन चाले तरुचे काव्य कळ मी जलद सुनेत्रा सहज उघडे टाळे तरुचे