-
दर्रारा – DARRAARAA
आधी वावटळ येते धूळ फर्रारा उडाया दिशा दाही नाचतात पीळ भर्रारा सुटाया पीळ सांग सोडवाया चक्रीवादळी पिसाटा ओत पोते भरुन मीठ भूत गर्रारा फिराया धाव धाव धावताती कृष्ण मेघ सैरावैरा कडाडते वीज बाई खरा दर्रारा कळाया अंगांगात भुईच्या ग काटे कुसळांची गर्दी मातीवर लोळ लोळे वात खर्रारा कराया शुभ्र टपोर गारांचा मारा ढगातून होई गात…
-
आम्ही – AAMHEE
टोक गाठुनी आलो आम्ही पारसनाथाचे टोक गाठुनी झालो आम्ही पारसनाथाचे भक्त पातले सम्मेदावर घागर घेवोनी टोक गाठुनी न्हालो आम्ही पारसनाथाचे रंग उधळुनी संधीकाली सूर्यकिरण हसता गंध चंदनी प्यालो आम्ही पारसनाथाचे वस्त्र किरमिजी रंगबिरंगी घेउन मेघांचे टोक गाठुनी ल्यालो आम्ही पारसनाथाचे पायताण पायात नसूनी त्या नच जोड्यांना टोक गाठुनी भ्यालो आम्ही पारसनाथाचे गझल – अक्षरगण वृत्त…
-
अर्घ्यावली – ARGHYAAVALEE
मातीलाही स्मरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो वाऱ्यामध्ये तरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो उदकचंदनी रेशिमधारा झेलत असता अंगागावर घटात भूमी भरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो खडीसाखरेसम गारांची जलदांमधुनी वृष्टी होता मातीसुद्धा वरते गाणे वळीव जेव्हा येतो धो धो तापतापुनी धूप जाळुनी फळाफुलांनी बहरुन येण्या धरा सावळी धरते गाणे वळीव जेव्हा…
-
गझल कामठा – GAZAL KAAMATHAA
गझल कामठ्यात तीर एक लावतोय आज भेदण्यास लक्ष्य वीर एक ठाकतोय आज एक दोन तीन चार आत्मरूप जाहलेत उधळण्या फुले अबीर एक पाततोय आज ध्यास त्यांस गझलचाच मुक्त तिज करावयास तळपत्या उन्हात पीर एक तापतोय आज चौकटीत ठाकठोक करुन मूर्त बसवलीय चौकटीस त्या जुनाट मीर पाडतोय आज घाट वळणदार गर्द भोवती कडे विशाल गाठण्यास शिखर…
-
संत – SANT
नाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे गाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे आरशाने तुझ्या त्या मला रूप दिधले भाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे जाहल्या एवढया गोड जखमा सुगंधी घाव का मी सुनेत्रा तुझे आठवावे संत होते तुझ्या अंतरी भेटलेले साव का मी सुनेत्रा तुझे आठवावे वेड होते मला जिंकण्याचे मलाही डाव का मी सुनेत्रा…
-
चौकट – CHOUKAT
तरही गझल गझलेची पहिली ओळ गझलकार इलाही जमादार यांची तसा कुणाच्या चौकटीत तो बसला नाही तरी कुणाला अंगणातही दिसला नाही फुलाफुलांची अंगणातली रांगोळी ही तिला जपाया पावसातही फसला नाही हवेहवेसे रंग फासुनी भिजवुन मजला कधीच माझ्या चौकटीत तो घुसला नाही जरी नव्याने चौकटीतल्या विश्वी रमले तरी कधीही मूक होऊनी रुसला नाही कसे हसावे हेच शिकविले…
-
हवाई – HAVAAEE
टाळ्या पिटू कवींची चोहीकडे सराई जो तो म्हणे स्वतःशी आहेच मी सवाई टाळ्या असोत अथवा तो गजर वाहवाचा करतोच जो इथेरे त्याची टळे पिटाई शंका नको पुसू तू अन जाबही कुणाला गिळण्यात मूग बसूनी आहे तुझी भलाई प्रश्नांस फोड वाचा अन मिळव उत्तरांना ना फोडशील वाचा करणार ते धुलाई तू फक्त मस्त म्हणरे मजला नकोत…