-
वेळ – VEL
ही न वेळ असे खरी वाट पाहण्याची…. हीच वेळ असे खरी भेटाया जाण्याची… गप्पांच्या मैफलीत रंग नवे भरण्याला … हृदय उघड उघड मना काव्य नित्य झरण्याला …. बोल फक्त बोल गात गुणगुणता काही… अंतरंग सांगतेय गुज मला बाई….
-
वाह व्वा – VAAH VVA
वाह व्वा वाह.. व्वा … या मुलींना सा.. र… काही कळत कळत …नकळत जुळत जातं … नकळत जुळत जुळत मळत पण जातं … म्हणून सांगते मुलींनो …आणि मुलग्यांनो , फार मळू … देऊ नका… वळायचं तेवढं वळून घ्या… कारण नंतर किती रडा …किती जोडा … उपयोग नाही होणार… ज्याच्या त्याच्या कर्मांचा हिशेब… चुकता मात्र करावाच…
-
कुंचला – KUNCHALAA
करी कुंचला सहज घेऊनी… रंगामध्ये पूर्ण बुडवूनी… सहज सहज फटकारे मारून … चित्र एक साकारे त्यातून… भिजव भिजवले त्यास चिंबूनी … रंगांवरती रंग उडवूनी … भिजला कागद… भिजली पाने… नवरंगांनी सजली पाने… अनेकान्त भावांची किमया… जणु पौषाची धारा तनया …. रंग आप अन भाव मनातील … करी उतरता …भिजतो कागद… सुकतो… भिजतो… पानावरती चित्र उमटते……
-
मोतीमाळ – MOTEE MAAL
लिहावी वाटते जेंव्हा कविता .. तेव्हाच लिहावी असं काही नाही कामे करता करताही लिहावी कविता एखादी .. किंवा रस्त्यातून चालता चालताही …. लिहावी एखादी कविता.. कामे असतातच निकडीची …रोज रोजच्या जगण्याची… ती तर करायलं हवीतच आधी… त्यानंतर मग… लिहावीच एखादी मुग्ध कविता… वेळ काढून …मूड पाहून.. साठलेल्या भिजलेल्या शब्दांतून ,,उचलावेत काही शब्द…काही क्षण… आणि लिहीत…
-
अप्पदिवो – APP-DIVO
अप्पदिवो मम अलख निरंजन नय दृष्टी सम अलख निरंजन कर्मफळे रसमय मिळवाया रत्नत्रय दीपक उजळाया व्यवहाराचा जम बसवाया मुक्तछ्न्द तम भ्रम पळवाया जीवाचा अभ्युदय व्हाया
-
विलय – VILAY
स्वर परिमल मम वेड लावतो ….. सहज वाहतो काव्यकलेतुन ….. अक्षर अक्षर वेचून मी मग….. एक गुंफते मोतीमाला…. स्वराक्षरातून नाद अंतरी उमटत जातो…. वलय वाढते…. विलय पावते काठावरती ….. तृणांकुरांवर…. दव बिंदूंसम…. ……
-
पूर्ण जीवन POORN JEEVAN
व्यवहारे जो जगे नये निश्चयाने त्याला मुक्ती वरे निश्चयाने सतमार्गाने जगावया पूर्ण जीवन आत्महिता मी जपे निश्चयाने