-
पाठवण – PAATHAVAN
लिहावयाला मजला पुरते एक आठवण आठवणींची नकोच गर्दी नको साठवण स्मरणांचे मी मणी ओवुनी माळ बनवली गळलेल्यांची करित आहे पुन्हा पाठवण जखमांमध्ये हळद भरूनी जखमा भरल्या मलम सुगंधी मला न रुचले जखमा सुकल्या मधुर मधुर मी शब्दांवरती नव्हते भुलले मधुराभक्ती शुद्धात्म्यावर जडवुन बसले जरी हरवले पुन्हा गवसले माझे मजला वळणावरती वळता वळता सापडले मजला
-
भिजली वर्दळ – BHIJALEE VARDAL
जवळपास वा दूरदूरवर ओळख सुकली भिजते आहे हिरवा श्यामल फिकट पारवा श्रावण घन मनी दाटत आहे निळसर राखी सडकेवरुनी भिजली वर्दळ वहात आहे वर्दळीस मी भरून डोळी घनास मनीच्या शिंपीत आहे किलबिल चिवचिव ऐकायाला वाऱ्यासंगे हलता झाडे पत्र्यांवरती टपटप उतरत पाऊस तेव्हा म्हणतो पाढे असेच केव्हातरी आवडे जगावयाला पावसासही पाढे म्हणता म्हणता गातो माझ्यासंगे मजेत…
-
मुरलीचे स्वर – MURALEECHE SWAR
अहह ! अहह ! आषाढ घनांतुन कृष्ण नीळ तन मन जलदांतुन शकुन्तलेचे कुंतल श्यामल बरस बरसती झरझर भूवर कुरळ कुरळ कचभार प्रियेचा उडवत जाता झोत हवेचा कालिंदीच्या सलील जलावर हिंदकळे राधेची घागर पाझरणाऱ्या त्या सलिलावर मुरलीचे स्वर… मुरलीचे स्वर….
-
बरस बरसला दारी – BARAS BARASALAA DAAREE
तरही कविता कवितेची पहिली ओळ कवी रमेश वाकनीस यांची मी कोसळणारा पाऊस पहिलावहिला अंतरी भरूनी हलके झरझरणारा आषाढ घनातुन संदेश प्रिये तुज देण्या मी येतो तुझिया नयनांत भराया वारा पाऊस थबकला बरस बरसला दारी मेघातुन आला लोळण घेण्या दारी अक्षरे पेरुनी भूवर मम अंगणी तो हसतो आहे हिरवेपण लेऊनी पानांचा पाऊस टपटपे भिजे माधवी पान…
-
पखरण – PAKHARAN
जाति : श्यामाराणी झुळुक पहाटे लहरत आली प्राजक्ताच्या झाडाखाली शुभ्र फुलांची पखरण झाली धवल केशरी रांगोळीने भुई चिंबली रंगात पानांवरुनी ओघळल्यावर थेंब दवाचे टपटपल्यावर लोळुन घुसळुन त्यात स्वतःला भिजली माती गंधात मातीवरचे टिपण्या दाणे रंगबिरंगी पक्षी आले टिपता दाणे गाती गाणे जणू आकडे बसलेले ते अंकलिपीतिल अंकात एक पाखरू निळे त्यातले भुंग्यामागे उडू लागले दमून…
-
अंतरात आई – ANTARAAT AAEE
जाति : परिलिना अजूनही तुझी छबी अंतरात आई.. (धृ.पद) दूर कुठे जाहलीस तुला पाहते मी सांजवात लावुन तुजसवे बोलते मी सुगंध धूप दरवळे शोक दूर दूर पळे स्वप्न तुझे पूर्ण फळे अंगणात पुष्पांनी वाकली ग जाई .. दादांची सखी प्रिया होतीस तू माय नातवंडे तुला जणु दुधावरील साय वदन तुझे सुस्वरूप हास्य तुझे चंद्ररूप नेत्र…
-
नीर झरा ग नीर झरा – NEER ZARAA G NEER ZARAA
गगन चुंबण्या उभ्या खड्या तुझ्याच अधरांवरुन कड्या मस्त नाचतो घेत उड्या खळखळ वाजत भरे घड्या घालत भूवर पायघड्या नीर झरा ग नीर झरा… जळी तरूंचे सांगाडे बाजुस शिंदीची झाडे त्यावर मेघांचे वाडे वीज कडाडुन ते पाडे ढगातून कोणा धाडे नीर झऱ्यास नीर झऱ्यास … कधी करितसे शांत जला बिंब दावण्या गवतफुला उडवुन अंगावर पाणी तृणपात्यांना…