Tag: Marathi Kavita

  • फुलके – Scone

    चट चट लाटच लाट फुलके चट चट लाटच लाट कट कट फारच फार नाही कट कट फारच फार खट खट वाजच वाज दारा खट खट वाजच वाज झट झट काढच काढ चित्रे झट झट काढच काढ लट लट डोलच बाळा लट लट डोलच डोल टच टच भरले नेत्र सुंदर टच टच भरले नेत्र टप टप…

  • किल्ली – KILLEE (key)

    डबे जरी तव कैक नवे इंजिन माझे ऐक नवे अधर्म तू तर डोंबारी करण्या संसारी वारी फेकशील जर माळ्याला चिटकुन बसशिल टाळ्याला येतिल सैनिक जाळाया जाळुन कचरा गाळाया मूषक फाडे जाळ्यांना निमित्त ठरण्या टाळ्यांना किती किती तुज समजाऊ तुझिया शब्दांना खाऊ छक्के चौके फटकाऊ नौकारांना मटकाऊ मांजर माझी सुंदर रे कर ले उसको अंदर रे…

  • मोजमाप – MOJAMAAP (measurement)

    गान हृदयीचे वा देहाचे ते गाणे असते इंद्रियांच्या शक्तीचे ते मोजमाप असते अपुले अपुले गाणे सुंदर आपण गावे द्यावे गाता गाता जगत अलौकिक दिपवुन टाकावे कधी न करावी चोरी आपण दुसऱ्यांच्या पैशांची स्वकष्टाने धन कमवावे मिळेल सुख शांती वंशवेल वाढण्या आपुली कुटुंब जपणे धर्म देशाचे स्वातंत्र्य टिकविण्या अभिव्यक्ती धर्म

  • एक कोकरू – EK KOKAROO (a lamb)

    एक कोकरू हुंदडणारे … पण आकुळलेले काळ्या डोळ्यांमधे वेदना … होते बावरलेले … कुणी अनामिक अनोळखी जरी…. कुशीत अलगद शिरले … कवळुन घेता प्रेमभराने शांत शांत जाहले… तृप्त अनामिक तृप्त कोकरू … नेत्र मेघ भरले … जलदांमधुनी थेंब टपोरे गाली झरझरले …. अधरांवरती हलके हलके …. हसू निरागस फुलले …

  • शिशीर गान – SHISHEER GAAN (song of winter)

    पाऊस यावा अंगणभर अंगांगी काटे कुंपणभर आवाज यावा ढगी गड गड पडाव्या गारा छपरावर वेचाया हातांची ओंजळ करू मुठीत मोठाल्या गारांना धरू मंडपी चिंब जाई नि जुई जा ग जा चिऊ घरट्यात बाई जा उड रे काऊ शुभ शुभ गाऊ शिशिरात बुडण्या धारांत न्हाऊ

  • वेताळ – VETAAL

    आम्ही वेताळ वेताळ जोडू आकाश पाताळ पोसू नारळ बागांना करत काम नि धिंगाणा नारळ विकून बाजारी फेडू मागची उधारी मस्तीत दावत तेगार घालू पालथा बाजार पायपूसणी मोलाची खऱ्या प्रीतिच्या तोलाची बाजारी विकत घेउया डोंगरी झऱ्यात धुवूया कुटाळ कर्मे जाळूया धर्म दिगंबर पाळूया जंगल पाताळ बाजार समुद्र आकाश शेजार सुंदर शेजी शेजारी कटेल खोटा व्यापारी मात्रा-१४

  • घर्पण – GHARPAN

    आजारी मन ज्यांचे त्यांना करते तर्पण केवळ आत्मा शरण्य माझा करे समर्पण माझ्यामधल्या समृद्धीने झळके दर्पण शुद्ध भावना जिन देवाला करते अर्पण क्षुद्र जिवांच्या क्षुद्र भावना जाळे सर्पण प्रशस्त माझ्या बंगल्यात सळसळते घर्पण