-
रसोई – RASOEE (KITCHEN)
घरास माझ्या खिडक्या दारे आत वाहते वसंत वारे प्रभात समयी पक्ष्यांसंगे मन म्हणते मज गा रे गा रे बागेमधली फुले पाहुनी काव्य बरसते दरवळणारे अन्न शिजविते रसोईत मी शुद्ध चवीचे आवडणारे अंगणात गप्पांची मैफल सोबतीस मम प्रियजन सारे जिवलग प्रेमाचे शेजारी जणू हासरे भवती तारे घरात तुजला नाही थारा जा दुःखा तू जा रे जा…
-
नर्तिके – NARTIKE (dancer girl)
नाच आज खास मस्त रात्र नर्तिके धुंद फुंद जाहलेत गात्र नर्तिके नर्तनात तांडवी जपून नाच तू पातलेत सान मौन छात्र नर्तिके बाण सोडतेस कैक दांडियातुनी भासतेस तेजरूप क्षात्र नर्तिके नाचतात लक्ष लक्ष नर्तिका जरी भावतेस तूच एक मात्र नर्तिके कृष्ण श्याम नील वर्ण मेघ वर्षती सांडते भरून पूर्ण पात्र नर्तिके गझल अक्षरगण वृत्त (मात्रा २०)…
-
सोनतुला – SON-TULAA (balancing with gold)
धुतल्या तांदूळासम येथे सापडलेका कोण तुला पुरे जाहले अता तोलणे तुला सांगते जोडतुला स्वर्णतुलेची वजने मापे गझलेमधले शिरोमणी त्यांचे प्याले सांडायाची का वाटे रे ओढ तुला डोळ्यावरती बांधुन पट्टी न्यायदेवता उभी इथे न्यायाधिश तू न्याय खरा दे शोभत नाही मौन तुला स्वार्थासाठी कोणी अपुल्या बळी देतसे जीवाचा शरीर पुद्गल सिद्ध कराया दुभंगेल ही सोनतुला नजर…
-
किरमिजी – KIRMIJEE (crimson)
-
गजरा – GAJARA(torse)
गडद निळे गडद गडद आभाळ सावळे झाले काळ्या काळ्या जलदांनी नभ भरुनी आले मौक्तिक माळा घालुन सजल्या श्याम मेघना शीळ घालतो मारुत मंजुळ खग घेती फांदीवर ताना झरझर झरझर झरती धारा टपटप टपटप पानांवरती मुदगंधाचा सुगंध प्राशुन शब्द उधळले पानांवरती गोळा करुनी शब्द अंजलीत टपोर गजरा कुणी बनविला माय आठवे सुंदर माझी तिनेच गजरा असा…
-
नियम – (rule)
-
विठ्ठल – name of God