Tag: Marathi Kavita

  • काव्यजल – KAAVY-JAL

    माय मराठी प्राणाहुन प्रिय मरगठ्ठे जन गर्जा जय जय कुंडलिका अन नीरा पवना मुळा मुठा वारणा कोयना महाराष्ट्र मम सुजला सुफला शिवबा शंभू जेथे लढला कभिन्न कातळ फोडित पत्थर स्वच्छ जले झुळझुळती निर्झर ज्ञानदेव नामा तुकयाची अभंग गाथा ओवी साची पुणे मुंबई मावळ डगरी खऱ्या शोभती उद्यम नगरी वाऱ्या वाऱ्या घुमव बासरी ओत काव्यजल भरुन…

  • पथ हा निर्जन – PATH HAA NIRJAN

    पथ हा निर्जन स्वच्छ मोकळा पिवळ्या पुष्पांनी सजलेला पुढे दुतर्फा वृक्ष देखणे पर्ण रहित घन गर्द फुलोरा दूर दूर पथ कोठे जाई भेटायाला कुठल्या गावा स्वच्छ बाकडी सुनी सुनी ही कुणी न त्यावर बसावयाला धरणीवरती श्याम सावळ्या आकाशाची निळसर छाया पीत फुलांचा सडा भूवरी झुळूक स्पर्शते हरित तृणाला कोणासाठी कुणी बनविला सुंदर झुळझुळता हा रस्ता

  • बिंब – BIMB

    जेव्हा प्रिय मम डोईत घुसते नशा तयाची चढते चढते पुरती मी मग वेडी बनते अप्रियांचे वेड काढते अन प्रियांना वेड लावते… डोईमधल्या अनंत खोल्या गडद जांभळ्या पडदेवाल्या खोल्यांमध्ये प्रिय मग शिरते सामानाला विखरुन देते बंद कपाटे उघडुन सारी सामानाला विखरुन देते विस्मृतीतल्या घड्या चाळते दुःखालाही चिडवित बसते चिडवुन चिडवुन रडव रडवते रडताना मग खो खो…

  • मिसळ – MISAL

    कधी खावी मिसळ कधी मटकी उसळ मटकी मोडाची मैत्रीण लाडाची मैत्रीण गोरटी नजर चोरटी नजर लागली बाहुली सुकली बाहुली नकटी सुंदर छाकटी सुंदर सुंदर कित्ती बिलंदर बिलंदर माऊ चल साय खाऊ साय आणि साखर मायेची पाखर मायेचं माहेर माहेरची वाट वाटेतला घाट घाटातली झाडी झुकझुक गाडी गाडी गाते गाणे पाखरू दिवाणे …….  

  • सर – SAR

    “नखाचीही सर नाही तुजला, सत्यवान प्रिय सावित्रीच्या”; म्हणते कोणी विजेस जेव्हा, वीज कडकडे ढगामधुनी… वीज म्हणे मग त्या कोणाला, “कसला रे तू मूढ बावळा?” ‘सर ना माझ्या नजरेची या कधीच ना रे कुणास आली नखात साठे घाण म्हणोनी नजरेने मी नखे जाळली”””…

  • बाबा – BAABAA

    बनायची आई दुर्गा अन बनायचे बाबा मग आई। “उठू नको तू भल्या पहाटे” म्हणायचे मज “झोपच बाई”। बूट करोनाचे मज घेण्या हिंडायाचे पायी पायी। म्हणायचे मज इमाम वेडा ऐकून माझी बडबड गाणी। ‘पाकीट पैसा’ मला द्यायचे हौसेखातर माझ्या काही। रडायचे मी जेव्हा जेव्हा उडायची बाबांची घाई। गेल्यावरती निघून बाबा दिसती बाबा ठाई ठाई। बाबा गेले…

  • केळीचे हे बाग – KELEECHE HE BAAG

    केळीचे हे बाग कशाने अवचित सुकले? नजर लागली केळफुलाला म्हणून सुकले. म्हणून सुकले गीत कोणते अखंड बन हे? परवशतेचे गीत गाउनी सुकले बन हे. परवशता ही एक गुलामी तोडुन तिजला. . स्वतंत्र होउन मुक्त गातसे बन केळीचे…