-
येडबंबू – YED-BAMBOO
काव्यप्रकार -मंगळिका मंगळून पण कोण बरे ऐकत नाय? येडबंबू त्याचे नाव कळले काय! टंगळ मंगळ कामाला करतय कोण? ज्याला येतात सदोदित फोनच फोन. ध्यान करतय बसून बाळ छतावरती। आत्माराम पाळण्यातच झोप घेती…
-
जन्मसाल – JANM SAAL
काव्यप्रकार -मंगळिका जन्मसाल बदलण्या कुणी केला झोल? दोषग्या जो बोलबच्चन अडग्या ढोल. कुडमूड्याच्या डोळ्यांना का रे पूर? राघु गेला उडुन त्याचा वनात भूर. रानातल्या फांदीवरी पोपट मौन। आत्म्यामध्ये देव पहा बाकी गौण…
-
बोल – BOL
काव्यप्रकार -मंगळिका बोल कुठला पदार्थ हाय अतीव गोड? खाउन ज्याला मन म्हणते नाते जोड. नात्यामध्ये नातं कुठलं सुंदर बोल? नात्यात ज्या लोकाकाश दिसते गोल. लोकाकाशावरी सिद्ध शीला हाय। भव चक्रास भेदुन तिथे आत्मा जाय…
-
कुंडलीत – KUNDALEET
काव्यप्रकार -मंगळिका कुंडलीत कोणाच्या रे मंगळ सांग? स्त्रिया आणिक पुरुष जे जे प्याले भांग. पानापासुन भांग कशी बनते सांग? पाने त्याची पाट्यावर वाटुन छान. नशा नको भांगेची मज करेन ध्यान। आत्म्यासंगे बोलाया माझी तान…
-
नाकावरच्या – NAAKAAVARCHYAA
काव्यप्रकार -मंगळिका नाकावरच्या रेषेवर लिहिलंय काय? रुपसुंदर कन्येची ती कविता हाय. कलेमध्ये खऱ्या प्रवीण मुलगी कोण? वेदीवर जी ठेवतेय मूर्ती दोन. मूर्तीमध्ये शोभतोय आत्मा छान। कल्पनेने गाऊयात स्तुति गुणगान… मात्रावृत्त – १४+७=२१ मंगळिका या काव्यप्रकारात ६ चरण असतात. सहाही चरणात १४+७=२१ अश्या मात्रा असतात. पहिल्या व तिसऱ्या चरणात प्रश्न विचारलेला असतो. दुसऱ्या व चौथ्या चरणात…
-
परिमल – PARIMAL
परिमल उधळित पुष्प पाकळ्या उमलत जाती रंग बरसती धुंद होउनी कोमल पाती कोमल पाती मुग्ध कळ्यांशी माझे नाते गरगर फिरतो हात आणखी दगडी जाते जात्यामधुनी पीठ झरझरे ऐकत किलबिल वाऱ्यासंगे गात येतसे झुळझुळ परिमल
-
प्याल्यामध्ये पेय भरावे – PYAALYAA MADHYE PEY BHARAVE
प्याल्यामध्ये पेय भरावे भरून गाण्या हात पाय अन ध्येय असावे तरून जाण्या जाण्यासाठी दूरदूरवर पैल तटावर भटकत असतो गात गुराखी ताल सुरांवर बासरीतुनी गीत उतरते डोळ्यांमध्ये थेंबे थेंबे प्रेम बरसते प्याल्यामध्ये