-
पर्व पर्युषण – PARVA PARYUSHAN
भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे…
-
गझलसदृश्य – GAZAL SADRUSHYA
जर्द रवीला जाळ म्हणूया भडक फुलांची दुशाल म्हणुया करे प्रदर्शन दानाचे जी तिजला बोली सवाल म्हणुया स्वच्छ मनाचे मुलगे जे जे त्या मुलग्यांना बाल म्हणूया पक्षपात जो कधी न करतो त्याला सुंदर काल म्हणूया कटकट मोडे त्या काष्ठाला मस्त भिजोनी वाळ म्हणूया जीव जीवाला जीवच म्हणतो पुदगलास पण माल म्हणूया सिंहकटीसम कमर जिची तिज चाळ…
-
प्रीतीसंगम – PREETEE SANGAM
कऱ्हा असूदे अथवा नीरा नीर तिच्यातील स्वच्छ वाहूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे काठावरती मळे फुलावे हिरवे हिरवे ऋतू सजावे कणसामध्ये भरोत दाणे झुळूक गात वाहूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे नद्यान करिती पर्वा याची कोण पिकविते काय जलातून देत राहती विनाअपेक्षा काही कुणी म्हणूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे अंतर अपुले…
-
पझल – PUZZLE
सोट्या म्हणजे शशांक मज्जू म्हणजे मधुरा आमची पोरे गातात वाघासारखी गुर्रारा सोट्या लिहितो आर्टिकल मज्जू लिहिते गझल दोघे मिळून घालतात छान छान पझल सोट्याची होती बझल आता झाली एडीपी मज्जूची होती सिनिजी आता झाली एरीजोस्काय आम्ही चौघे हाय फाय
-
रेन एणाराय – RAIN ENAARAAY
येणार हाय एणाराय पाऊस येणार हाय रेन एणाराय झिमझिम सरींनी अंगण भिजणाराय कधी काळी जमिनीत पेरलेलं बी बियाणं बोलू लागणाराय अंकुरातून अक्षर अक्षर मान वर उंच करणाराय अक्षर अक्षर चढत वर शब्द सुंदर दिसू लागणाराय नाजुक पोपटी पानांवर शब्द शब्द बरसू लागणाराय शब्दांचीच पानं होणाराय पानांचेच शब्द होणाराय पानं पानं जोडून जोडून डहाळी डहाळी डूलणाराय…
-
नाजुक रज्जू – NAAJUK RAJJOO
कॅब कॅब लवकर ये सोट्याला तू घेऊन ये सोट्या झाला हजर लिहितो अकाउंट भरभर हसतो बोलतो गालभर चालतो कसा तरतर फिरतो साऱ्या घरभर सोट्या आमचा आनंदात घर डुलते झोकात वारे भर्रारा तोऱ्यात आली आली मज्जू घेऊन नाजुक रज्जू झाली झाली मज्जा पाडला कवितांचा फज्जा
-
खरेपणा – KHAREPANAA
मुक्त जाहले जीव सर्व हे आज सुखाचा दिवस खरा सर्व जिवांचा धर्म अहिंसा खरेपणा हा मंत्र बरा जीवासाठी जीव जपूया प्रेमासाठी प्रेम जपू हृदयामधला ईश्वर दिसण्या प्रत्येकातील मूल जपू पूर्ण कराया तरुणांच्या अन बालांच्याही इच्छांना वृद्धत्वातील बाल्य जपूया बाल्यामधल्या मोदांना नको वाटते कर्मकांड तर उखडुन टाका मनातुनी दिसेल तुम्हा आत्म्यातिल इश नित्य उमलत्या फुलातुनी उडा…