Tag: Marathi Kavita

  • बॉय बॉय – BOY BOY

    गर्ल गर्ल बॉय बॉय हाय हाई है हाय आम्ही झालो हाय फाय करतो नाजुक बाय बाय वापरतो हो वाय फाय दारी येता बुवा बाय पुसतो त्याला काय काय चहाला पण म्हणतो चाय खातो मस्त साखर-साय मजबुत करण्या आमचे पाय दारी येते गौरा गाय खोट्याला ती म्हणते लाय नाही म्हणत नाय नाय ताईला ती म्हणे ताय…

  • गुरुजी -GURUJEE

    इमली ओक अन एनर्जी बोकोबा त्यांचे गुरुजी इमली आंबट चिंबटशी ओक वृक्ष पण आळशी एनर्जी ती सदा हसे शिकवीत त्यांना धडे बसे म्हणे ,” I (आय) बघ इमलीचा O (ओ) ओकतो मस्तीचा मस्तीमधल्या युक्तीचा N (एन) अर्जीच्या शक्तीचा बोकोबांच्या भक्तीचा”. इमली ओक अन एनर्जी बोकोबा त्यांचे गुरुजी…

  • संगीत – SANGEET

    सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा म्हणता म्हणता शिकलो आपण गाणे सुंदर जगण्याचे सूरपेटीवर फिरवित बोटे शिकलो संगीत फुलण्याचे हुरहुर थोडी… थोडी थोडी अगदी थोडी वाढविते प्रेमातिल गोडी तबल्यावरती ताल धराया त्या तालाचे गणित कळाया धर आधी पायांनी ठेका ऐक कधी मोराच्या केका सोड तुझा…

  • सण रमझान – SAN RAMZAAN

    श्रावण मासी सण रमझान करूया आनंदाचे पान श्रावण धारा बरस बरसती चिमण पाखरे चिवचिवती क्षीरकुर्मा अन मधुर मिठाई खात गाऊया मंजुळ गाणी मोद वाटूया निसर्गातला निसर्ग फुलण्या छान करूया आनंदाचे पान श्रावण मासी सण रमझान

  • कालसर्प – KAAL SARP

    राहू-केतू कुंडलीतना मनात अपुल्या आहे कालसर्प हा पत्रिकेतना विकृतीत आहे कशास पूजा निवारणाला दोष मतीतच आहे सम्यकत्वी जो असतो त्याला वीष न असले चढते मिथ्यात्वाचे पालनपोषण अज्ञानाने होते अज्ञानाला दूर करूया धर्म खरा जपण्या सम्यकज्ञानी शूर वीरांची चारित्र्ये फुलण्या

  • कॅमेरे – CAMERE

    बास झालं लिहिणं बिहिणं चल आता हुंदडायला अंगणातल्या झाडावरचे पिवळे गुलाब मोजायला उमलते गुलाब टपोऱ्या कळ्या खिदळतात हसतात वेड्या खुळ्या डोळ्यांचे कॅमेरे दोन दोन फुलांचे फोटो घेतंय कोण हिरव्या पोपटी पानांवर गुलाबाच्या गालिच्यावर प्रेम तुझं नि माझं हसतंय पाकळी पाकळ्यांवर तेवढ्यात आल्या कित्ती बाया साळकाया अन माळकाया फुलं तोडून पसार झाल्या माझं हसू घेऊन गेल्या…

  • कविता रडली – KAVITAA RADALEE

    माझ्यामध्ये गझल उमटली तुझ्यामुळे पण कविता रडली रडता रडता हसू लागली टपोर मोती उधळत खुलली फुलली गळली पुन्हा प्रकटली मुग्ध कळ्यानसम लाज लाजली लाजेचीही लाज वाटता ठिणगीसम ती फुलू लागली पाऊस पाडून मग ठिणग्यांचा लज्जेला ती जाळत गेली निर्लज्जांसम निडर बनली वीज होऊनी गगनी गेली मेघांना ती चोपून आली झरझर धारा वर्षत असता त्यांच्यासंगे नाच…