-
संगीत – SANGEET
सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा म्हणता म्हणता शिकलो आपण गाणे सुंदर जगण्याचे सूरपेटीवर फिरवित बोटे शिकलो संगीत फुलण्याचे हुरहुर थोडी… थोडी थोडी अगदी थोडी वाढविते प्रेमातिल गोडी तबल्यावरती ताल धराया त्या तालाचे गणित कळाया धर आधी पायांनी ठेका ऐक कधी मोराच्या केका सोड तुझा…
-
सण रमझान – SAN RAMZAAN
श्रावण मासी सण रमझान करूया आनंदाचे पान श्रावण धारा बरस बरसती चिमण पाखरे चिवचिवती क्षीरकुर्मा अन मधुर मिठाई खात गाऊया मंजुळ गाणी मोद वाटूया निसर्गातला निसर्ग फुलण्या छान करूया आनंदाचे पान श्रावण मासी सण रमझान
-
कालसर्प – KAAL SARP
राहू-केतू कुंडलीतना मनात अपुल्या आहे कालसर्प हा पत्रिकेतना विकृतीत आहे कशास पूजा निवारणाला दोष मतीतच आहे सम्यकत्वी जो असतो त्याला वीष न असले चढते मिथ्यात्वाचे पालनपोषण अज्ञानाने होते अज्ञानाला दूर करूया धर्म खरा जपण्या सम्यकज्ञानी शूर वीरांची चारित्र्ये फुलण्या
-
कॅमेरे – CAMERE
बास झालं लिहिणं बिहिणं चल आता हुंदडायला अंगणातल्या झाडावरचे पिवळे गुलाब मोजायला उमलते गुलाब टपोऱ्या कळ्या खिदळतात हसतात वेड्या खुळ्या डोळ्यांचे कॅमेरे दोन दोन फुलांचे फोटो घेतंय कोण हिरव्या पोपटी पानांवर गुलाबाच्या गालिच्यावर प्रेम तुझं नि माझं हसतंय पाकळी पाकळ्यांवर तेवढ्यात आल्या कित्ती बाया साळकाया अन माळकाया फुलं तोडून पसार झाल्या माझं हसू घेऊन गेल्या…
-
कविता रडली – KAVITAA RADALEE
माझ्यामध्ये गझल उमटली तुझ्यामुळे पण कविता रडली रडता रडता हसू लागली टपोर मोती उधळत खुलली फुलली गळली पुन्हा प्रकटली मुग्ध कळ्यानसम लाज लाजली लाजेचीही लाज वाटता ठिणगीसम ती फुलू लागली पाऊस पाडून मग ठिणग्यांचा लज्जेला ती जाळत गेली निर्लज्जांसम निडर बनली वीज होऊनी गगनी गेली मेघांना ती चोपून आली झरझर धारा वर्षत असता त्यांच्यासंगे नाच…
-
जलद तोटी – JALAD TOTEE
कश्शाला पाऊस पडेल सांगा कशाला पाऊस पडेल बाई हृदय भरून येतच न्हाई वाऱ्याची झुळूक चुंबत नाही सच्छिद्र देह झरत नाही डोळ्यात आसवे भरत नाही पापण दले हलत नाही पाऊस थेंब पडत नाही लिहीग सई काहीबाही लिहित रहा टपोर गाणी दवाच्या बिंदूंचे साठव पाणी मिसळ त्यात गारांचे पाणी बुडव तयात मातीचे हात सारव तयांनी अंगण गात…
-
मल्हार राग गाऊ – MALHHAAR RAAG GAAOO
डोळ्यात साठलेला घनगर्द भाव पाहू मेघात दाटलेला मल्हार राग गाऊ उडवीत मृत्तिकेला वाहील मस्त वारा जलदातुनी सुखाच्या वर्षोत प्रेमधारा नाचोत पंचभूते देहात कोंडलेली तुटूदेच साखळीही हृदयास काचणारी हातात हात घ्यावा तू नाचऱ्या विजेचा कर श्वास मोकळा तू मौनातल्या धरेचा ही वीण घट्ट मी ची उसवेन मी स्वतःही आभाळ बरसता हे बरसेन मी स्वतःही