Tag: Marathi Kavita

  • बदाम आंबा – BADAAM AAMBAA

    चोखुन चोखुन आंबा खा चवीत पुरता बुडून जा आंबा आहे भलता गोड त्याच्याशी तू नाते जोड कर योगा अन होना रोड नाद जीमचा आता सोड नकोस ठेवू भीड नि भाड मुजोरड्यांना पाडच पाड पाण्यामध्ये होडी सोड पुरव जिवाचे कौतुककोड होशील आता मालामाल हंसासम डौलाने चाल नको घाबरू वळणांना वळणावरच्या थांब्यांना हवा कशाला तुज थांबा तू…

  • अक्षर ओळी – AKSHAR OLEE

    गझल काफिया रदीफ गातो माझ्यासंगे शरीफ गातो उत्सव असुदे अथवा जलसा तीन दले धर्माला पळसा गजल लिहावी अथवा कविता शुद्ध जले वाहूदे सरिता गझल गझाला गज्जल असुदे नीर तयातिल नीतळ असुदे साळुंकी वा म्हण साळुंखी फक्त जाण तू तो तर पक्षी सुंदर देही सुंदर आत्मा हेच सांगते गाता गाता गाणे गाता बाग फुलावी शिंपुन केसर…

  • ऊठ मुला – OOTH (UTH) MULAA

    ऊठ मुला जागा हो सत्वर तुला जायचे बघ कामावर विधी आटपुन भल्या पहाटे प्रसन्न ताजे तुजला वाटे करून कामे लवकर लवकर घरास ये तू बनून अवखळ आनंदाने हसत राहशिल जीवन जगण्या फ़ुलशिल खुलशिल आता ना मज कुठली चिंता आत्म्यामध्ये तू भगवंता

  • कविता – KAVITAA

    कविता असुदे वाकडी अथवा सरळ किंवा वेलांटीदार वळणा वळणाची ! तिचं वाकडेपणसुद्धा कधी कधी जपावं ! तिचं सरळपण साधावं तिची मोहक वेलांटीदार वळणे आपणही घ्यावीत… वेलांटीत वाकावं, उकारात उडावं ! काना मात्र्यात टिपावं चिंब भिजलेलं मन ! मग नकळत हसावं विसर्गात अधर  किंचित वक्र करून ! कविता असतेच एक हलकी मोळी गझल वृत्तात बांधल्यास होते…

  • बिजली बाला – BIJALEE BAALAA

    मीही घडले तीही घडली तोही घडला हाही घडला … आपण घडलो घडले सारे कधी पडताना घडले मीरे दिवसा मोजीत होते तारे ! भिजवून गेले सुगंध वारे अशीही घडले तशीही घडले घडता घडता कधी बिघडले ! हमसून हमसून मीही रडले… पिंजऱ्यातले बंद हुंदके फुटल्यावरती मौक्तिक बनले नक्षत्रांची नव्हती माला नव्हता मृग अन चित्रा स्वाती ! तरीही…

  • लिहावी सुंदर गझल! – LIHAAVEE SUNDAR GAZAL!

    लिहावी सुंदर गझल ! सुंदर कविता, सुंदर कथा, सुंदर समीक्षा ! स्वतःसाठी! कधी दुसऱ्यासाठी ! कधी तिसऱ्यासाठी ! तर कधी सर्वांसाठी ! मोकळ्या मनाने लिहित जाल स्वतःसाठी तर आपोआपच लिहित जाल सर्वांसाठी !

  • वहीचं पान – VAHEECHA PAAN

    वहीचं पण स्वच्छ सुरेख; आखीव आणि रेखीव ! लिहित असते काहीबाही त्यावर मुक्त! कधी बांधीव! विचार, भावना, बुद्धी यांचं तयार होताच एक अनोखं रसायन हृदयातून झरझर बरसायला लागतात शब्द शब्द ! शब्द उमटत जातात बोटांमधून कागदावर पानावर ! त्याची कधी होते कविता कधी होते कथा कधी गझल कधी ललित ! लिहिता लिहिता काहीबाही सुंदर सुद्धा…