Tag: Marathi Kavita

  • वाजले बारा – VAAJALE BAARAA

    बघ वाजले बारा अता वाजवु तिन तेरा अता धादांत खोटे बोलणारे मौन का झालेत सारे काटा पुढे सरके पळे अज्ञानही सरुनी गळे आता तरी बोला खरे जपण्यास अपुली पाखरे ही पाखरे फुलपाखरे अपुलीच जणु ही लेकरे भय सोडुनी मत नोंदवा अधिकार आहे गाजवा या तोडुया कारा अता प्या मुक्त हा वारा अता

  • सोन्याचा शिंपला – SONYAACHAA SHIMPALAA (golden mussel)

    एक तुला मी दिला शिंपला सोन्याचा शिंपला दवबिंदूंना झेलायाला सोन्याचा शिंपला दोन शिंपले मिळून बनते हृदय आपुले जरी उघड शिंपला अलगद वरचा हो पंखांची परी दोन शिंपले दोन दलांसम घे तू पाठीवरी होउन खग मग घेच भरारी निळ्या घनांच्यावरी हृदयामधल्या दवबिंदूचे मोती उधळित जा पडतील मोती जेथे जेथे अमृत शिंपित जा येतील वरती मातीमधुनी मोत्यांची…

  • पर्व पर्युषण – PARVA PARYUSHAN (jain festival)

    भाद्रपदातिल शुक्ल पंचमीस पर्व पर्युषण येते खास तिथिस या नेमाने मग प्रियची आठवण येते प्रिय म्हणजे जो हृदयी वसतो व्यर्थ न भटकत बसतो धर्म अहिंसा स्थापित करण्या मनामधे अवतरतो देवघराचा मोह न प्रियला प्रियवर मोहित सैनी पुण्यभूवरी प्रियसाठी नव मंदिर बांधे जैनी क्षमा मार्दवे जीव शोभतो आर्जव सुवर्ण कंकण देह शुद्ध अन हृदयी शुचिता हे…

  • गझलसदृश्य – GAZAL SADRUSHYA (some what like ghazal, but not in proper ghazal meter)

    जर्द रवीला जाळ म्हणूया भडक फुलांची दुशाल म्हणुया करे प्रदर्शन दानाचे जी तिजला बोली सवाल म्हणुया स्वच्छ मनाचे मुलगे जे जे त्या मुलग्यांना बाल म्हणूया पक्षपात जो कधी न करतो त्याला सुंदर काल म्हणूया कटकट मोडे त्या काष्ठाला मस्त भिजोनी वाळ म्हणूया जीव जीवाला जीवच म्हणतो पुदगलास पण माल म्हणूया सिंहकटीसम कमर जिची तिज चाळ…

  • प्रीतीसंगम – PREETEE SANGAM (“confluence of love”)

    कऱ्हा असूदे अथवा नीरा नीर तिच्यातील स्वच्छ वाहूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे काठावरती मळे फुलावे हिरवे हिरवे ऋतू सजावे कणसामध्ये भरोत दाणे झुळूक गात वाहूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे नद्या (“न करिती पर्वा याची कोण पिकविते काय जलातून देत राहती विनाअपेक्षा काही कुणी म्हणूदे प्रीतीसंगम दोन नद्यांचा तिसरीलाही साद घालूदे अंतर…

  • पझल – PUZZLE

    सोट्या म्हणजे माझा लेक मज्जू म्हणजे माझी लेक आमची पोरे गातात वाघासारखी गुर्रारा सोट्या लिहितो आर्टिकल मज्जू लिहिते गझल दोघे मिळून घालतात छान छान पझल सोट्याची होती बझल आता झाली एडीपी मज्जूची होती सिनिजी आता झाली एरीजोस्काय आम्ही चौघे हाय फाय

  • रेन एणाराय – RAIN ENAARAAY (“It is going to rain”)

    येणार हाय एणाराय पाऊस येणार हाय रेन एणाराय झिमझिम सरींनी अंगण भिजणाराय कधी काळी जमिनीत पेरलेलं बी बियाणं बोलू लागणाराय अंकुरातून अक्षर अक्षर मान वर उंच करणाराय अक्षर अक्षर चढत वर शब्द सुंदर दिसू लागणाराय नाजुक पोपटी पानांवर शब्द शब्द बरसू लागणाराय शब्दांचीच पानं होणाराय पानांचेच शब्द होणाराय पानं पानं जोडून जोडून डहाळी डहाळी डूलणाराय…