Tag: Marathi Kavita

  • शीर्षक दहा – SHEERSHAK DAHAA

    कवितेचं शीर्षक पहा शीर्षक दहा ! कविता लिहिते पानावर, क्रमांक त्याचा दहा ! पाच अधिक पाच केल्यास मिळतात हो दहा ! दोन गुणिले पाच करा मिळतीलच दहा ! वीसातून उणे करून बघा दहा ! मिळवायला दहा !! वीसाला भागा दोनने भागाकार दहा ! शंभराला दहाने भागा उत्तर मिळेल दहा ! शंभराचे काढा वर्गमूळ भेटतील दहा…

  • अक्षरछंद – AKASHAR CHHAND

    अक्षर छंद खूप आहेत खूप म्हणजे खूप अनंतानंत छंद लिहून वाजवा आता सूप एक अक्षराची एक ओळ एकाक्षरी छंद दोन अक्षरांची ओळ म्हणजे दोनाक्षरी छंद अशीच वाढवा अक्षरे होण्या अनंताक्षरी छंद छंदांचा फार फार नका करू छंद जास्तच कराल तर बनेल तो फंद बरा आपला खळाळता स्वच्छ मुक्तछंद मजेमजेने चाखावा छंदांचा गुलकंद नियम पाळावे स्वतः! …

  • छंद सतराचा – CHHAND SATARAAHAA

    एक म्हणजे फेक नाही एक म्हणजे एकच दोन म्हणजे कोण नाही दोन म्हणजे दोनच तीन म्हणजे हीन नाही तीन म्हणजे तीनच चार म्हणजे ठार नाही चार म्हणजे चारच पाच म्हणजे काच नाही पाच म्हणजे पाचच सहा म्हणजे महा नाही सहा म्हणजे सहाच सात म्हणजे घात नाही सात म्हणजे सातच आठ म्हणजे गाठ नाही आठ म्हणजे…

  • मा प उ झ – MAA PA U ZA

    मापउझ – मायेचा पक्षी उडावा झणी झउपमा – झऱ्याला उपमा हृदयाची पझल प्रेमाचा सजल मेघांचा पाऊस रेघांचा निळसर रेषांचा कुरळ्या केसांचा बदलत्या वेषांचा हिरव्या देशांचा घर मेणाचा जमीन शेणाचा छप्पर देवाचा प्रश्न पेचाचा उत्तर टेचाचा गझल वेड्यांचा हझल बेवड्यांचा

  • ट्विटर – TWEETER

    सकाळी सकाळी काऊ साद घाली हाक ऐकुनी ती मला जाग आली हवा पावसाची किती छान वाटे फुलांभोवतीचे जणू रम्य काटे घटा सावळी ती जशी कृष्णबाला कुणी घातल्या या नभी मेघमाला बाग नाचते ही स्वैर वारियाने कुहुकार केला तिथे कोकिळाने ट्विटरच्रिपर ट्विटरच्रिपर नाद वेगळे हे घुडू घुडू खुडू खुडू बोल आगळे ते पावसाच्या स्वागताला पाखरे गाताती…

  • हृदय पाखरासंगे गावे – HRUDAY PAKHARAASANGE GAAVE

    जसे वाटते तसे लिहावे त्या त्या समयी अर्थ कळावे नंतर काथ्याकूट करोनी जे जे हितकर तेच जपावे अनेक जीवांसाठी सुद्धा उपयोगी ते नित्य पडावे लिहिणाऱ्याला महत्व द्यावे ज्याचे त्याला श्रेय मिळावे फुकट कुणी ना ते लाटावे इतिहासाला जतन करावे भूगोल सुंदर घडवित जावे व्यायामाने तन घडवावे अभ्यासाने मन फुलवावे कलागुणांनी बहरुन यावे व्यवहाराला अचुक असावे…

  • गुड-गुड गाणी – GUD-GUD GAANEE

    पहाट गाणे पाखरू  गाते वाटिका प्रभाती दवात न्हाते चिवचिव किलबिल गुडगुड गाणी खळखळ झरझर वाहते पाणी डोलते नाचते तृणाचे पाते… गप्पा अन गोष्टी कराया नित्य हसत खेळत बोलावे  सत्य जपावे सुंदर चहाचे नाते … झुळूक हवेची घरात यावी सुगंधी लहर नाकाने प्यावी गरगर फिरवित दगडी जाते … उप्पीट शिरा लोणचे खावे उदरभरण मज्जेत करावे अंगणी…