Tag: Marathi Kavita

  • धिंगाणा – DHINGAANAA

    पुन्हा पुन्हा यावी दारी पावसाची सर चिंब चिंब व्हावे पुन्हा मन सैरभैर अंगणात चिमण्यांनी धिंगाणा घालावा आई आई म्हणताना जीव वेडा व्हावा येशीलका आई घरी होउनीया परी दादांसवे गप्पागोष्टी करावया घरी रांधेन  मी तुझ्यासाठी मऊ भात खीर दादांसाठी लढावया होईन मी वीर आई दादा कुठे आता असाल जगात जिथे आहे तिथे तुम्ही असाल सुखात…

  • अजूनही ती – AJOONAHEE TEE

    अजूनही ती मजला जपते अडखळता मी उंबरठ्याशी… हात देउनी मज सावरते अजूनही ती मजला जपते गाठी घालित आणिक आवळीत बसते जेव्हा शल्य मनातिल हळूच शिरते बोटांमध्ये उकलुन गाठी मन उलगडते अजूनही ती मजला जपते… तिचे सजवणे घास भरवणे आठवताना मन झरझरता नाजुक साजुक बोली बनते अश्रुंसंगे बोलत बसते पापण काठी बांध घालते अजूनही ती मजला…

  • ब्रीद – BREED

    मतदानाला जाऊ सारे निघा घरातुन बाहेर मतदानाचे केंद्र सुरक्षित जणू साजिरे माहेर प्रातःकाळी उठून सगळी कामे करुया भरभर केंद्रावरती गर्दी होता रांगा लावू झरझर आठवणीने घेउन जाऊ ओळखपत्रे खरीखुरी मतदानाचा हक्क बजावुन आनंदाने येऊ घरी नको गुलामी पाय चाटणे स्व-अभिमानी बनू बरे अंधश्रद्धा पूर्ण उखडणे हे तर माझे ब्रीद खरे

  • असाच वेडा पीर हवा – ASAACH VEDAA PEER HAVAA

    अमोघ माझा धीर असा सुवर्णपाती तीर जसा असेल बिंदू लक्ष्य जरी अचूक भेदे मीर तरी करात नाही शस्त्र गदा लढेल ऐसा वीर सदा खणेल कोणी खाण तिथे झरेल वाणी नीर इथे विवेक सिंधू साठवितो जलातले तो क्षीर पितो स्फुरेल ज्याला मंत्र जगा असाच वेडा पीर हवा वृत्त – ल गा ल गा गा, गा ल…

  • कान-कावळा – KAAN-KAAVALAA

    कधी कधी मी टांगेवाली कधी कधी अन भांडेवाली भांडेवाली मी नखर्याची करे धुलाई हर पात्रांची कधी डोईवर घेउन हारा विकते भांडी दारोदारा सुबक ठेंगणा लठ्ठ सावळा तेल भराया कान-कावळा तेलाने जेंव्हा कळकटतो जोर लावुनी घास घासते धरुन नळाच्या धारेखाली स्नान घालते त्यास सकाळी तयात ओतून गोडेतेला नीट ठेवते वरी टेबला बांधुन बुचडा मग केसांचा फडशा…

  • असी मसी अन कृषी – ASEE MASEE AN KRUSHEE

    मंत्र हाच या सहस्त्रकाचा असी मसी अन कृषी माणसातले देव शोधती मुनी आणखी ऋषी शास्त्र लिहावे काव्य सुचावे जमीन कसावी अन रक्षावी कन्या माता बहिणींसाठी घरकुल आणिक बाग असावी पिता पुत्र अन बंधू सारे या भूमीचे पिऊन वारे देशासाठी एक होऊया लोकशाहीला टिकवूया मित्र मैत्रिणी करू एकजुट शुद्ध भावना मनात बळकट स्वतंत्र भारत सुवर्ण भूमी…

  • प्रश्न मंजुषा – PRASHN MANJUSHHAA

    मी लिहिते अगदी सहज सहज लिहिते कसं लिहू काय लिहू? म्हणत म्हणत लिहितेच लिहिते कारण… असं सहज सहज लिहायलाच मला खूप आवडतं पण मला काय माहीत की, मी जे लिहिते त्यात असतात; कोणाच्या काहीबाही प्रश्नांची उत्तरे ! मग तयार होते माझ्याही मनात एक भलीमोठी प्रश्न मंजुषा! मग मीच वाट पहात बसते माझ्या तसल्याच अगदी सहज…