Tag: Marathi Kavita

  • रंगीत चष्मा – Tinted Glasses

    रंगीत चष्मा रंगीत रंगीत चढवा डोळ्यावर ऐका संगीत तप्त दुपारी फिरताना चढवा काळा मस्ताना दुपारी बघायला सूर्याचं मखर चढवा लालस सुपर डुपर पाऊस आहे पाणी आहे तरी पृथ्वी  रडते हिरवा गॉगल चढवल्यावर हिरवेगर्द हसते चष्मा घाला निळा निळा गोड सुरात गाईल गळा पिवळा चष्मा घाला बघू पडेल हळदी ऊन पौर्णिमेचा ऑलमंड म्हणेल मीच मून मून…

  • पुणेरी चैन – The Pune Style of Peace

    आधी वाचल्या पुणेरी पाट्या नंतर घेतल्या ताट अन वाट्या बाप म्हणाला असंच कर तसंच केलं आय बोलली मौनातच पोर कामातून गेलं पुणेरी पाट्या पुणेरी सैनी करतोय लग्न पुणेरी जैनी भैन म्हणतेय आण रे वैनी मैत्रीण म्हणते हाक मार जीव होईल गार गार आजचा दिवस करेन पार लेखणी तापली चढली धार सपासपा करतीय वार चल चल…

  • घडवा सर्व सुंदर – “Create everything beautifully”

    घडवा सर्व सुंदर सुंदर क्षितीज आणिक धरणी अंबर बांधतील वृक्षांना झुंबर पैंजणात वेलींचे घुंगर गातिल गाणे सुंदर सुंदर मिटेल जीवांमधला संगर अधर घालता ठिणगीवर फुंकर तयात फुलती तेजस अंकुर मंत्र अहिंसा म्हणतिल कंकर थांब जहाजा आले बंदर वेड्या पाड्या हंबर हंबर उधळत गा तू सुंदर सुंदर

  • वेणीफणी – Grooming the hair

    माप उलट माप उलट झरा झरझरुदे उलट सुलट झरझर धान्य सांडू दे घरात बाहेर पडून आता उंबऱ्यात माड! ताड! झालेत ताडमाड! पक्ष्यांना आता गाण्यासाठी धाड… पक्षी गातोय पहाटगाणे ट्विट ट्विट कुहू कुहू ! झणी म्हणू की तुला वणी कर लवकर वेणीफणी खाउयात सुतरफेणी वनी वणी नीव णीव नीव म्हणजे काय बाय कळतंय पण आठवत नाय…

  • आधी सुधारा स्वतःला – “First, improve yourself”

    आधी सुधारा स्वतःला त्यानंतर जगाला ! स्वतःपासून कराल जर सुरुवात तर मग पेटेल मस्त ज्योत ! ज्याच्या वाती सात सात !! देहाचे निरांजन प्रकाश देईल परिसर सारा उजळून जाईल ! दिव्यात ओता तेल प्रेमाचे वहन असावे प्राणवायूचे ! सम्यकदर्शनाची ओढता काडी ! पकडा सहज ज्ञानाची नाडी !! चालेल सुंदर चारित्र्याची गाडी 1!! नियोजनाने वसवा नगरे…

  • अक्षरछंद – “poetic metre based on syllables”

    अक्षर छंद खूप आहेत खूप म्हणजे खूप अनंतानंत छंद लिहून वाजवा आता सूप एक अक्षराची एक ओळ एकाक्षरी छंद दोन अक्षरांची ओळ म्हणजे दोनाक्षरी छंद अशीच वाढवा अक्षरे होण्या अनंताक्षरी छंद छंदांचा फार फार नका करू छंद जास्तच कराल तर बनेल तो फंद बरा आपला खळाळता स्वच्छ मुक्तछंद मजेमजेने चाखावा छंदांचा गुलकंद नियम पाळावे स्वतः! …

  • चक्कर – Turn

    एक म्हणजे फेक नाही एक म्हणजे एकच दोन म्हणजे कोण नाही दोन म्हणजे दोनच तीन म्हणजे हीन नाही तीन म्हणजे तीनच चार म्हणजे ठार नाही चार म्हणजे चारच पाच म्हणजे काच नाही पाच म्हणजे पाचच सहा म्हणजे महा नाही सहा म्हणजे सहाच सात म्हणजे घात नाही सात म्हणजे सातच आठ म्हणजे गाठ नाही आठ म्हणजे…