Tag: Marathi Kavita

  • वसंत गीत – VASANT GEET

    माघ फाल्गुनी वसंत वारे कृष्ण अंबरी अनंत तारे आम्रतरू गुलमोहर फुलतो बहर जोवरी तोवर झुलतो पक्षी उडती दिगंत सारे चैत्र उन्हाची रंग पंचमी गाते सरिता दंग संगमी गीत तिला जे पसंत गारे ग्रीष्म काहिली येथे तगमग सहा ऋतुंची जेथे लगबग घेण्या अंमळ उसंत यारे मात्रावृत्त (८+८=१६मात्रा)

  • धागा – DHAAGAA

    काळ्या मातीमधली धवला नाजुक साजुक कपास आणू साध्या यंत्रावरती हलके कोमल कणखर दोरा बनवू वळून दोरे हातावरती अखंड मजबुत धागा घडवू मृद्गंधासम बकुळ फुलांच्या अर्कामध्ये त्याला बुडवू जास्वंदीच्या चुरुन पाकळ्या कुंकुमवर्णी रंगी भिजवू सुकवुन धागा पीत सुवासिक शेवंतीची फांती गुंफू सुई कशाला फुले गुंफण्या कुशल अंगुली आपण वळवू

  • जाण – JAAN

    कर्तव्याचे भान असूदे हक्क मागताना खरेपणाची जाण दिसूदे  भाव तोलताना स्याद्वादाची दृष्टी असूदे अर्थ लावताना व्यवहारातिल चोखपणाला व्यवहाराने जाणा व्यवहारातिल निश्चय जपण्या ताठ असावा बाणा ताठ असावा कणा बुद्धिचा परी नच ताठर रे ममतेच्या पातीची त्यावर घालू पाखर रे लेखणीची वा तलवारीची जात इमानी खरी जीवातिल चैतन्य टिपाया लढते धरेवरी लढता लढता पडेल अथवा मरेल…

  • धोंडा होते मी – DHONDAA HOTE MEE

    पारा होते मी बघ ओघळले मी धारा झाले मी किल्ला होते मी पडले झडले मी पाया झाले मी कारा होते मी तुटले फुटले मी वारा झाले मी तारा होते मी चपला बनले मी उल्का झाले मी ओढा होते मी भिजले भरले मी दाता झाले मी काया होते मी हसणे शिकले मी आत्मा झाले मी साकी…

  • शाळा – SHAALAA

    प्राण्यांची भरली शाळा पक्षी झाले गोळा त्यांनाही दिली जागा फुलांच्या रंगीत बागा प्राण्यांना दिले पटांगण त्यांनी केले रिंगण खेळ खूप खेळले खेळामध्ये दंगले आकाशी उडाले पक्षी सुंदर हवेत नक्षी पक्षी आले रिंगणावर खाली उतरले भराभर त्यांनी आणला फळा शाळेला लागला टाळा

  • तरूतळी – TAROOTALEE

    या स्थळी तरूतळी स्वच्छ सुंदर झोपडी धरी शिरी सावली गर्द झुंबर झोपडी झुलतसे बाळ गुणी पांघरोनी गोधडी अंगणी सई विणे अंगडी अन टोपडी लिहित बसे गोप कोणी उघडुनी चोपडी दूर तिथे बोलण्यात दंगलेली चौकडी नगरजन  नित्य येती वाट करुनि वाकडी

  • थोडी नाही थोडी नाही – THODEE NAAHEE THODEE NAAHEE

    थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी म्हण तिला लाडे लाडे शाणुबाई उठा इग्गो बिग्गो अग्गो असला सोडा खुळचटपणा आवाजात भसाड्या गाणे गुणगुणा ठोकून द्या थाप म्हणा हाच राग तोडी… थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी शेजारणीशी जोरजोरात करा गप्पाटप्पा उघडून टाका मनाचा कुलूपबंद…