-
जाण – JAAN
कर्तव्याचे भान असूदे हक्क मागताना खरेपणाची जाण दिसूदे भाव तोलताना स्याद्वादाची दृष्टी असूदे अर्थ लावताना व्यवहारातिल चोखपणाला व्यवहाराने जाणा व्यवहारातिल निश्चय जपण्या ताठ असावा बाणा ताठ असावा कणा बुद्धिचा परी नच ताठर रे ममतेच्या पातीची त्यावर घालू पाखर रे लेखणीची वा तलवारीची जात इमानी खरी जीवातिल चैतन्य टिपाया लढते धरेवरी लढता लढता पडेल अथवा मरेल…
-
धोंडा होते मी – DHONDAA HOTE MEE
पारा होते मी बघ ओघळले मी धारा झाले मी किल्ला होते मी पडले झडले मी पाया झाले मी कारा होते मी तुटले फुटले मी वारा झाले मी तारा होते मी चपला बनले मी उल्का झाले मी ओढा होते मी भिजले भरले मी दाता झाले मी काया होते मी हसणे शिकले मी आत्मा झाले मी साकी…
-
शाळा – SHAALAA
प्राण्यांची भरली शाळा पक्षी झाले गोळा त्यांनाही दिली जागा फुलांच्या रंगीत बागा प्राण्यांना दिले पटांगण त्यांनी केले रिंगण खेळ खूप खेळले खेळामध्ये दंगले आकाशी उडाले पक्षी सुंदर हवेत नक्षी पक्षी आले रिंगणावर खाली उतरले भराभर त्यांनी आणला फळा शाळेला लागला टाळा
-
तरूतळी – TAROOTALEE
या स्थळी तरूतळी स्वच्छ सुंदर झोपडी धरी शिरी सावली गर्द झुंबर झोपडी झुलतसे बाळ गुणी पांघरोनी गोधडी अंगणी सई विणे अंगडी अन टोपडी लिहित बसे गोप कोणी उघडुनी चोपडी दूर तिथे बोलण्यात दंगलेली चौकडी नगरजन नित्य येती वाट करुनि वाकडी
-
थोडी नाही थोडी नाही – THODEE NAAHEE THODEE NAAHEE
थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी म्हण तिला लाडे लाडे शाणुबाई उठा इग्गो बिग्गो अग्गो असला सोडा खुळचटपणा आवाजात भसाड्या गाणे गुणगुणा ठोकून द्या थाप म्हणा हाच राग तोडी… थोडी नाही थोडी नाही होना खूप वेडी स्वतःमधल्या शहाणीला करना पुरती वेडी शेजारणीशी जोरजोरात करा गप्पाटप्पा उघडून टाका मनाचा कुलूपबंद…
-
हलवा – HALAVAA
काटेरी मोहक हलवा नाजुकसे जडाव घडवा गझलेच्या तनुवर सजवा प्रेमाने नाती जुळवा वचनांनी सुंदर हसवा अंगणी झुलावा झुलवा ताटवा फुलांचा फुलवा काव्याचा भरुनी गडवा अंतरे प्रीतिने सजवा डोईवर कळसा चढवा
-
आयुष्यावर – AAYUSHYAAVAR
प्रेम करायचे असते बघ आयुष्यावर ओझे नसते बनायचे बघ आयुष्यावर आयुष्याचा हिशेब नसतो मांडायचा आठवणींचा अल्बम असतो जपावयाचा आयुष्यावर म्हणुन लिहावी सुंदर गाणी त्यात भेटते आपल्यामधली कुणी दिवाणी म्हणायचेना अशी दिवाणी असा दिवाणा प्रेमामध्ये समान सारे नसे बहाणा नुसते तू तू नुसते मी मी रोग मनाचे मीपण तूपण पथ्यापुरते जपावयाचे मीपण बघण्या वेळ जरासा मनास…