-
गहिवर – GAHIVAR
अक्षर अक्षर तापवले ..प्राण फुंकले श्वासामधुनी .दवबिंदूंनी त्यांस शिंपले…परिमल घेऊन झुळूक आली ..सुरभीत झाली शब्दफुले …लहर नाचली वाऱ्याची ..अनगहिवर आला भाव भरायादहिवर जैसे ..शेतामधल्या साळीवरती…सृष्टिमाता प्रसन्न हसली…खुद्कन गाली…गालावरच्या खळीत तिचिया..अंकुरले बीज.. ओले..भिजले…हळू हळू ते रुजले खुलले..पर्णांच्या जोडीतून हसले…प्रकाश पाणी वाऱ्यासंगे ..तरू वाढले…सुगंध उधळत फुले उमलली …फुलाफुलातून रसमय सुरभीत ..पक्व फळांची बाग बहरली…रात्र चांदणी गात बरसली..पहाटवाऱ्यासंगे…
-
चांदण्यात चतुर्दशी
अंताक्षरी स्वराक्षरे ..ओव्या अभंगांची खाण..गात गुणगुणते मी .. भागते मी बोजडास … कधी गझल लिहावी लगावलीला टाळून …कधी सहज लीलया ..धावणारी मात्रेतच .. बेसुमार वा सुमार .. तणांसवे वाढे ऊस..कसे खुरपावे तण,, धो धो कोसळे पाऊस माझी चपला नाचरी वीज ढगातून नाचे ..अंगणात खळ्यांमध्ये स्वच्छ किती नीर साचे… सोन्यासम रान पान लखलख कंच पाती…सांजवात लावते…
-
काय टाकू – KAY TAKU
हले काळीज स्पंदनी जशी वारियाने वातनिरांजनी स्नेहधार तेवतेय शांत शांतशांत कारुण्य रसात भिजलेली नेत्र ज्योतआई तुझ्या घरी माझा सूर पोचवितो वातजाई जुई चमेलीचा गंध येतो गुलाबासचिवचिव किलबिल पाखरांची शाळा खासये ग आई माझ्या घरी होउनीया गोड बाळकाय टाकू ओवाळून तुझ्यापुढे म्हणे काळ
-
घटाव – GHATAAV
आत्मप्रदेशी तरंगणारा तणाव माझासबब अहिंसेकडेच आहे झुकाव माझा मणी असूदे अथवा पाते दांड्याविन तेघुसळण होण्या पृष्ठावरती दबाव माझा घाटदारला शब्द बोलिचा घटाव सुंदरअर्थ काढणे स्वतःस हितकर सराव माझा शोध मुमुक्षु मणी तळी जो रुतून बसलाअज्ञानी मूढांना लागे न ठाव माझा काकडारती केका घन्टा बांग नमोस्तूशुभ भावांच्या भरतीमधुनी उठाव माझा
-
ओळख – OLAKH
वेदीवरली गजान्तलक्ष्मीफुगून रुतली गजान्तलक्ष्मी अंधपणाने करून प्रीतीमरुन जन्मली गजान्तलक्ष्मी कबूल कर तू चुका स्वतःच्यातुझीच चुकली गजान्तलक्ष्मी आत्मपरीक्षण स्वतः स्वतः करओळख असली गजान्तलक्ष्मी केवळ हो हो शून्य आचरणमला न पटली गजान्तलक्ष्मी
-
सोळाकारण – SOLAKARAN
स्वभावात आनंदी आहेजिनांचीच अनुयायी आहे जिनशासन सत शासन आहेसोळाकारण भक्ती आहे लाल रेघ हे यंत्र मारतेआतमशक्ती मंत्री आहे खुशीत मात्रा मोजत असतेशेरांचीच लढाई आहे गुणगुणल्यावर सहज मोजतेअलामतीवर प्रीती आहे नाव सुनेत्रा मक्त्यामध्येगझल रतन मम युक्ती आहे
-
हालदारी – HAALDARI
बांगड्या भरणार आहेभूमिका कासार आहे हालदारी सूर्य बुडतासमईचा आधार आहे मांडली भांडी दुकानीजाहले बोगार आहे काफिया होशील जेव्हांबिलवरांना धार आहे रंगता मेंदीत तळवेपाटली चढणार हे